कार्तिकची जागा घेऊ शकणारे चार खेळाडू कोण? 

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

मुंबई : भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी सध्या प्रचंड चुरस आहे. त्यामुळे संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करून संघातील स्थान पक्के करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण काही दुर्दैवी खेळाडू मात्र देशांतर्गत स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळाल्यानंतर पुरेशी छाप सोडू शकत नाहीत. दिनेश कार्तिक हे यापैकी एक ताजे उदाहरण आहे. वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात संधी मिळालेल्या कार्तिकला पहिल्या दोन कसोटींमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच त्याला दुखापतही झाली.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी सध्या प्रचंड चुरस आहे. त्यामुळे संधी मिळाल्यानंतर चांगली कामगिरी करून संघातील स्थान पक्के करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण काही दुर्दैवी खेळाडू मात्र देशांतर्गत स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळाल्यानंतर पुरेशी छाप सोडू शकत नाहीत. दिनेश कार्तिक हे यापैकी एक ताजे उदाहरण आहे. वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात संधी मिळालेल्या कार्तिकला पहिल्या दोन कसोटींमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच त्याला दुखापतही झाली. यामुळे उर्वरित सामन्यांसाठी त्याला संघातून बाहेर तर जावे लागलेच, शिवाय आगामी आशिया करंडक स्पर्धेसाठीच्या संघातील त्याचे स्थानही डळमळीत झाले आहे. 

आशिया करंडक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळविण्यासाठी चार खेळाडू रांगेत आहेत. 

1. केदार जाधव 
आयपीएलमध्ये पहिल्याच सामन्यात केदारला दुखापत झाली. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना त्याने केदारला अष्टपैलू खेळाडू म्हणून वापरले. त्याच्या फलंदाजीबरोबर गोलंदाजीही संघासाठी उपयुक्त ठरते. आयपीएलमधील दुखापतींनंतर आता केदार पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. नुकत्याच झालेल्या 'अ' संघांच्या चौरंगी स्पर्धेत केदारने चांगली कामगिरी केली. धोनी आणि हार्दिक पांड्यासह केदार हा संघातील 'फिनिशर' म्हणून स्थिरावला आहे. 

2. अंबाती रायडू 
अलीकडच्या काळातील सर्वांत दुर्दैवी खेळाडू असे रायडूचे वर्णन करता येऊ शकेल. तो ऐन भरात असताना भारतीय संघात त्याच्यासाठी स्थान उपलब्ध होत नव्हते. आता तो पुन्हा फॉर्म गवसला असताना तंदुरुस्तीच्या चाचणीमुळे त्याला संघात स्थान मिळाले नाही. चौरंगी मालिकेत खेळून त्याने क्षमता आणि तंदुरुस्ती दोन्ही सिद्ध केले आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षणाचा असलेला अनुभव त्याला कार्तिकच्या जागी संधी देऊ शकतो. 

3. मनीष पांडे 
चौरंगी स्पर्धेतील दिमाखदार कामगिरीमुळे मनीष पांडेने आशिया करंडक स्पर्धेसाठी संघातील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. या स्पर्धेत त्याने एकदाही बाद न होता 306 धावा चोपल्या. वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावरील फलंदाज ही भारताची डोकेदुखी आहे. मनीष पांडे हा यावरील उपाय ठरू शकतो. 

4. रिषभ पंत 
दिल्लीच्या या खेळाडूने यंदाच्या वर्षात सातत्याने दर्जेदार कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने फटकेबाजी करून वनडे संघासाठी स्वत:ची उमेदवारी सिद्ध केली. तर कसोटी संघामध्ये स्थान मिळाल्यानंतरही उत्तम यष्टिरक्षण आणि आक्रमक फलंदाजी यामुळे केवळ दोनच सामन्यांनंतर त्याने उपयुक्तता सिद्ध केली आहे. कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचत रिषभने स्वत:च्या आगमनाची थाटातच घोषणा केली. धोनीसाठी 'बॅक अप' म्हणून रिषभची आशिया करंडक स्पर्धेसाठी निवड होऊ शकते.


​ ​

संबंधित बातम्या