'या' भारतीय खळाडूने शाहिद आफ्रिदीला सुनावले  

टीम ई-सकाळ
Monday, 6 July 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने शाहिद आफ्रिदीने केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या ऍशेस मधील सामन्याप्रमाणेच किंवा त्याहून अधिक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा हाय-व्होल्टेज सामना म्हणून पहिला जातो. त्यामुळेच जगभरातील अनेक क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. नव्व्दच्या दशकात पाकिस्तानच्या संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये चांगलाच दबदबा होता. आता परिस्थिती पूर्ण पालटली असून, पाकिस्तानचा संघ भारतीय क्रिकेट संघाच्या आसपास देखील नाही. मात्र इतिहासातील याच गोष्टीचा दाखला देत पाकिस्तान क्रिकेट संघातील शाहिद आफ्रिदीने , आम्ही भारताला अनेकवेळा पराभूत केले असल्याचे एका मुलाखती मध्ये म्हटले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने शाहिद आफ्रिदीने केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शाहिद आफ्रिदीच्या टीकेवर उत्तर देताना, आफ्रिदीच्या वेळेस कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघांमधील समतोल हा सारखाच असल्याचे आकडेवारी वरून निदर्शनास आणून दिले व तसेच टी -20 मध्ये भारत हा पाकिस्तानपेक्षा वरचढच असल्याचे देखील आकाश चोप्राने म्हटले आहे. पाकिस्तानचा संघ एकेकाळी चांगला मजबूत असल्याचे नमूद करत, आकाश चोप्राने आजही एक ठीक संघ असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त आकाश चोप्राने पूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शारजाह येथील सामन्यात पाकिस्तानच्या संघाचे पारडे वरचढ ठरल्याचे सांगून,  मात्र त्यावेळेस शाहिद आफ्रिदीचा समावेश पाकिस्तानच्या संघात झालेला नसल्याचे म्हटले आहे. आणि जेव्हा आफ्रिदी पाकिस्तान संघाकडून खेळू लागला तेंव्हापासून तो निवृत्त होईपर्यंत भारतीय संघाची परिस्थिती बदलली असल्याचे आकाश चोप्राने आकडेवारी देत म्हटले आहे. 

ला लिगा :  रिअल माद्रिद संघाचा ऍथलेटिक बिलबाओ वर विजय   

इम्रान खान, वसीम अक्रम ते वकार युनूस  यांच्या दरम्यान पाकिस्तानचा संघ नक्कीच बलाढ्य असल्याचे आकाश चोप्राने सांगितले. या पाकिस्तानच्या खेळाडूंनी खरोखर चांगली कामगिरी केल्याचे आकाश चोप्राने आवर्जून सांगताना, मात्र आफ्रिदीच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारीचा आढावा घेतल्यास, 15 कसोटी सामन्यांपैकी दोन्ही संघानी प्रत्येकी 5 सामने जिंकले असल्याचे सांगितले. व 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने 39 तर, पाकिस्तान संघाने 2 सामन्यांमध्ये अधिक विजय मिळवत 41 सामने जिकंले असल्याचे आकाश चोप्राने सांगितले. त्यामुळे फक्त 2 सामने गमावल्याबद्दल कोणीही क्षमा मागितली असेल यासंदर्भात शंका असल्याचे आकाश चोप्राने म्हटले.            

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

तसेच टी -20 प्रकारात भारताने 7 सामने जिकंले असून, पाकिस्तानने एकच सामना जिंकला असल्यामुळे, भारत हा पाकिस्तानपेक्षा वरचढच असल्याचे देखील आकाश चोप्राने सांगितले. विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात तुलना केल्यास भारत हा नेहमीच पाकिस्तान संघाला धूळ चारत असल्याचे आकाश चोप्राने अधोरेखित केले. व 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील अंतिम सामना सोडल्यास भारताने सतत चांगली कामगिरी केली असल्याचे देखील आकाश चोप्राने म्हटले. त्यामुळे आफ्रिदीच्या काळात दोन्ही संघातील परिस्थिती संतुलित होती आणि खरे पहायला गेले तर ती भारताच्या बाजूने झुकू लागली होती, असे आकाश चोप्राने आकडेवारीवरून स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीने एका मुलाखती दरम्यान, भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरण्यास नेहमीच आवडायचे व प्रत्येक वेळेस भारताला पराभूत केले असून, त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू सामन्यानंतर माफी मागायचे असा दावा शाहिद आफ्रिदीने केला होता.    

 


​ ​

संबंधित बातम्या