हॉकीपटू सरदारचा 'गुड-बाय' 

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

चंडीगड : शैलीदार हॉकीपटू आणि दीर्घ काळ नेतृत्व केलेल्या सरदारसिंग याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सांगता केली आहे. एक तप खेळल्यानंतर त्याने नवोदितांचा मार्ग सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेत असल्याचे त्याने नमूद केले, पण संभाव्य संघातून वगळण्यात आल्याच्या दिवशीच त्याने स्टिक म्यान करीत असल्याचे जाहीर केले. 

नुकतीच झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा भारतासाठी निराशाजनक ठरली. भारताला सुवर्णपदक राखण्यात अपयश आले आणि अखेर ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्या स्पर्धेत वाढत्या वयामुळे खेळाच्या वेगावर परिणाम झाल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. त्यानंतरही त्याने टोकियो ऑलिंपिकमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

या पार्श्‍वभूमीवर त्याचा निर्णय अनपेक्षित ठरला. 
तो म्हणाला की, "12 वर्षांचा काळ मोठा आहे. मी चंडीगडमध्ये कुटुंबीय, "हॉकी इंडिया' तसेच मित्रांशी चर्चा केली. आता जीवनात हॉकीच्या पलीकडे पाहण्याची योग्य वेळ आहे.' 

शिबिरासाठी वगळण्यात आल्याबद्दल विचारले असता त्याने प्रश्‍न टाळला. शुक्रवारी दिल्लीत निवृत्तीची औपचारिक घोषणा करू इतकेच त्याने नमूद केले. 

दृष्टिक्षेपात कारकीर्द 
- 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण 
- 350 पेक्षा जास्त सामन्यांत सहभाग 
- 2008 च्या सुलतान अझलन शाह करंडक स्पर्धेत नेतृत्व 
- तेव्हा भारताचा सर्वांत तरुण कर्णधार 
- 2008 ते 16 अशी आठ वर्षे नेतृत्व 
- 2014 च्या इंचॉन एशियाडमध्ये सुवर्ण 
- दोन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत रौप्य 
- दोन ऑलिंपिकमध्ये सहभागी 
- 2012 मध्ये अर्जुन; 2015 मध्ये पद्मश्री 

निवृत्तीचे कारण तंदुरुस्तीशी संबंधित नाही. आणखी काही वर्षे खेळू शकेन इतका तंदुरुस्त मी आहे, पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. माझ्यासाठी ही वेळ आता आल्याचे वाटते. जीवनात पुढील टप्प्याची वाटचाल मी सुरू करेन. 
- सरदार सिंग, माजी हॉकी कर्णधार 

संबंधित बातम्या