धक्कादायक ! 'निवड समितीतील सदस्य उचलायचे अनुष्काचे चहाचे कप'

वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निवड समितीमधील सदस्य हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत असायचे असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला आहे. सध्याच्या निवड समितीवर विराट कोहलीचे वर्चस्व पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत निवड समितीमधील सदस्य हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या पत्नीचे चहाचे कप उचलत असायचे असा धक्कादायक खुलासा माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केला आहे. सध्याच्या निवड समितीवर विराट कोहलीचे वर्चस्व पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

इंजिनिअर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "विश्वचषक पाहायला मी गेलो होतो. तिथे काही व्यक्ती अनुष्का शर्माचे चहाचे कप उचलत होते. या व्यक्ती कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण कालांतराने या व्यक्ती भारताच्या राष्ट्रीय निवड समितीमधील सदस्य असल्याचे समजले."

हा प्रकार निंदनीय असाच होता. पण जर असे प्रकार थांबवायचे असतील तर माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरसारखे खेळाडू निवड समितीमध्ये असायला हवेत, असेही ते म्हणाले.


​ ​

संबंधित बातम्या