शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

टीम ई-सकाळ
Sunday, 16 August 2020

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांचे आज कोरोनामुळे निधन झाले.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू चेतन चौहान यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. मागील महिन्याच्या  जुलैमध्ये 10 तारखेला चेतन चौहान यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. चेतन चौहान हे सध्याच्या उत्तर प्रदेश मधील सरकार मध्ये युवा आणि क्रीडामंत्री होते.

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...    

चेतन चौहान यांनी 40 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी कारकिर्दीत 31.57 च्या सरासरीने 2084 धावा आणि एकदिवसीय प्रकारात 21.85 च्या सरासरीने 153 धावा चेतन चौहान यांनी केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटच्या रणजी स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली कडून सहभाग घेतला होता. तसेच चेतन चौहा यांना 1981 मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. व ते  1991 आणि 1998 मध्ये उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य होते. यासोबतच चेतन चौहान यांची जून 2016 ते जून 2017 या कालावधीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे (एनआयएफटी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  

चेतन चौहान यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर लखनौमधील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी गुरग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उत्तर प्रदेशात सुरुवातीला मंत्री ब्रिजेश पाठक यांना कोरोनाची लागण झाली होती. चेतन चौहान यांच्या आधी गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्री कमल रानी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तर उपेंद्र तिवारी, जय प्रतापसिंह, राजेंद्र प्रतापसिंह, धर्म सिंह सैनी, मोती सिंह, महेंद्र सिंह या मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

चेतन चौहान यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य राज्य मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चेतन चौहान यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच क्रिकेट जगतातून देखील चेतन चौहान यांच्या निधनावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   


​ ​

संबंधित बातम्या