फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

टीम ई-सकाळ
Thursday, 28 November 2019

सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विनंती केल्यामुळे निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला.

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा वारंवार केल्या जातात. 2019 च्या विश्वकरंकड स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभव पत्करावा लागला. आणि तेव्हापासून सगळ धोनीच्या निवृत्तीकडे गांभीर्याने पाहू लागले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

पुढील महिन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर येत असून या मालिकेसाठी धोनीची निवड करण्यात आली नाही. त्याने अजून काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीविषयी सध्यातरी काही बोलणे चुकीचे ठरणार आहे. 

- हरभजन सिंग म्हणाला, 'दादा, आता यांची बदली कर'

बुधवारी (ता.27) एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने धोनी मुंबईत आला होता. त्यावेळी त्याने मीडियाशी संवाद साधला. त्याला त्याच्या फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता तो म्हणाला, जानेवारीपर्यंत काही विचारू नका. या त्याच्या उत्तरामुळे सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.

सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विनंती केल्यामुळे निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला. त्या अगोदरपासूनच माध्यमात त्याच्या निवृत्तीविषयी चर्चा रंगत होत्या. मात्र, निवृत्तीच्या प्रश्नावर त्याने उघडपणे बोलणे टाळले होते. विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. 

- INDvWI : जखमी शिखर धवनच्या जागी टीम इंडियात 'या' खेळाडूची वर्णी

 

ऋषभ पंतची सुमार कामगिरी पाहता आगामी मालिकांसाठी धोनी क्रिकेट पुनरागमन करेल, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी धोनीला संघात स्थान न दिल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा डोळ्यासमोर ठेऊन निवड समिती संघ निवड करत आहे. त्यामुळे धोनीला या संघात स्थान मिळणार नाही, असंच काहीसं चित्र दिसत आहे. 

- टीम इंडियातील 'चॉकलेट बॉय'च्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

आगामी आयपीएलमध्ये धोनी कशी कामगिरी करतो, यावर त्याचं टीम इंडियात पुनरागमन अवलंबून असेल, असं प्रशिक्षक शास्त्रींनी म्हटलं होतं. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानात धोनी कधी उतरणार याकडेच सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


​ ​

संबंधित बातम्या