धोनी सध्या काय करतो... थांबा, लवकरच दिसणार 'या' भूमिकेत 

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

पण जरा थांबा धोनी क्रिकेटपासून दूर जाणार नाही. भले तो मैदानावर दिसणार नाही पण समालोचन करताना निश्‍चितच दिसून येऊ शकेल. आणि तेही "दादा' गांगुलीच्या कोलकात्यात.

मुंबई : महेंद्रसिंग धोनी सध्या काय करतो? हा प्रश्‍न तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. ना ट्‌वेन्टी-20 संघात ना एकदिवसीय संघात. मग धोनी करतोय काय, पुढे खेळणार आहे नाही...निवृत्त तर झालेला नाही ना? असे एक ना अनेक प्रश्‍न पडलेले आहे. धोनीच्या घरच्या मैदानात म्हणजेच रांचीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामनाही झाला. चौथ्या दिवशी विराट कोहलीच्या टीम इंडियाने तो सामना जिंकला आणि त्याच दिवशी धोनीचे दर्शन झाले होते एवढेच! 

IPL 2020 : BCCI घेणार मोठा निर्णय; अमेरिकेत खेळणार आयपीएलचे संघ

आता तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी संघ रचना कशी असावी यासाठी प्रयोग सुरु आहेत पण त्यात कोठेही धोनीचा समावेश नाही. रिषभ पंतला पर्याय म्हणून संजू सॅमसनला संघात घेण्यात आले आहे. अशा परिस्थितीत धोनी आपल्याला पुन्हा कधी दिसणार असा प्रश्‍न त्याच्या चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे... 

MS Dhoni

पण जरा थांबा धोनी क्रिकेटपासून दूर जाणार नाही. भले तो मैदानावर दिसणार नाही पण समालोचन करताना निश्‍चितच दिसून येऊ शकेल. आणि तेही "दादा' गांगुलीच्या कोलकात्यात. होय, ईडन गार्डनवर भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या वहिल्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात समालोचन करण्यासाठी धोनीसमोर ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्टस्‌ने प्रस्ताव दिला आहे. 

इंग्लंडमधील 50-50 षटकांच्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी मास्टर ब्लास्टर विशेष समालोचकाच्या भूमिकेत दिसला होता. त्या वेळी त्याने अनेक प्रसंगही सांगितले होते. आता धोनीकडून विशेष टिप्पणी चाहत्यांना ऐकायला मिळू शकेल. 

शेतकऱ्याचंच पोर ते, मातीशी जोडून राहणारच!

मुळात धोनी हा अत्यंत हुशार कर्णधार म्हणून ओखळला जायचा. एवढेच कशाला विराट कोहली अडचणीच्या वेळी त्याचाच सल्ला घेताना अनेकदा दिसून येत होते. "डिआरएस'चे धोनी रिव्ह्यू सिस्टिम असेही नामकरण करण्यात आले होते. त्यामुळे धोनीच्या टिप्स आता थेट चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या