#RIPBobWillis : महान गोलंदाज बॉब विलीस यांची एक्झिट!

वृत्तसंस्था
Thursday, 5 December 2019

वेगवान गोलंदाज असणाऱ्या विलीस यांची फलंदाजांमध्ये वेगळीच दहशत होती. कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळताना त्यांनी 325 बळी मिळविले.

लंडन : इंग्लंडचे माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज बॉब विलीस (वय 70) यांचे बुधवारी (ता.4) निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनीच ही माहिती दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्यांच्या निधनाची माहिती देताना विलीस कुटुंबीयांनी आम्ही एक चांगली व्यक्ती, नवरा, वडील, भाऊ आणि आजोबा गमावलो आहोत. आम्हाला सदैव त्यांची आठवण येईल, असे म्हटले आहे. 

- मेस्सीने विक्रमी सहाव्यांदा जिंकला बॉलन-डी'ओर पुरस्कार

विलीस यांनी 1970-71 मध्ये ऍशेस मालिकेतून कसोटी पदार्पण केले. त्या वेळी ऍलन वार्ड जखमी झाल्याने 21 वर्षीय विलीस यांची इंग्लंड संघात वर्णी लागली होती. क्रिकेट विश्‍वात ते 'गूस' या टोपणनावाने प्रसिद्ध होते. वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज 1970 आणि 1980च्या दशकात धडकी भरवत असताना त्यांना विलीस हे उत्तर होते.

- ICC Test Rankings : 'किंग इज बॅक'; विराट पुन्हा ठरला 'टॉपर'!

वेगवान गोलंदाज असणाऱ्या विलीस यांची फलंदाजांमध्ये वेगळीच दहशत होती. कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळताना त्यांनी 325 बळी मिळविले. इंग्लंडमधील सर्वकालीन सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये त्यांचा चौथा क्रमांक लागतो. ऍशेस मालिकेत 1981 मध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयातील त्यांच्या कामगिरीची आजही चर्चा होते. अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी त्या कसोटीत इंग्लंडला विजय मिळवून देताना कारकिर्दीमधील 43 धावांत 8 बळी ही सर्वोत्तम कामगिरी केली होती. 

- BCCIने ज्याला नाकारले त्याच्याकडेच घेतोय बुमरा ट्रेनिंग

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर विलीस हे समालोचक म्हणूनही चांगले लोकप्रिय होते. त्यांनी प्रथम आणि नंतर अखेरपर्यंत ते स्काय स्पोर्टसवर क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत होते.

- भारताचा वेगवान मारा भारीये पण... : पाँटींग


​ ​

संबंधित बातम्या