`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात

संजय घारपुरे
Monday, 27 July 2020

भारताच्या कुस्ती शिबिरास ऑगस्टमध्ये सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने परदेशी मार्गदर्शकांना भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश आले असून जॉर्जियातील असलेले हे मार्गदर्शक 30 जुलैस भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : भारताच्या कुस्ती शिबिरास ऑगस्टमध्ये सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाने परदेशी मार्गदर्शकांना भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश आले असून जॉर्जियातील असलेले हे मार्गदर्शक 30 जुलैस भारतात दाखल होण्याची चिन्हे आहेत.

पुढील वर्षाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजकांनी घेतले मोठे निर्णय 

शाको बेनतिनिदीस आणि तेमो कॅझाराश्वीली या जॉर्जियातील मार्गदर्शकांनी आपण भारतात लवकरच येणार आहोत. आम्हाला आज रात्रीपर्यंत त्याबाबत निश्चित कळवण्यात येणार आहे असे शाको यांनी सांगितले. बजरंग पुनिया आणि जितेंदर किन्हा यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाको यांची नियुक्ती झाली आहे, तर तेमो ग्रीको रोमन संघाचे मार्गदर्शक आहेत. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यावर हे दोघे मार्गदर्शक मायदेशी परतले होते. 

ENGvsWI 3rd Test :स्टुअर्ट ब्रॉडच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंड मजबूत स्थितीत 

परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी वंदे भारत योजना सुरु आहे. त्याच विमानाद्वारे दोघे मार्गदर्शक भारतात येणार आहेत. आम्हाला भारतात जाण्याची परवानगी देण्यास जॉर्जिया सरकार तयार नव्हते. भारतात वाढणाऱ्या रुग्णांची चिंता त्यांना सतावत होती. मात्र आम्ही चर्चा केल्यावर परवानगी मिळाली असे शाको यांनी सांगितले. कुस्ती मार्गदर्शक भारतात नसल्याने त्याच्या मानधनात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय झाला होता. जास्त कपात टाळण्यासाठी ते भारतात येत असल्याची चर्चा आहे. मात्र दोघांनीही यास नकार दिला.


​ ​

संबंधित बातम्या