स्पॅनिश फुटबॉलला सुवर्णकाळ दाखवणाऱ्या फुटबॉलपटूने केली निवृत्तीची घोषणा  

टीम ई-सकाळ
Tuesday, 4 August 2020

स्पेनचा विश्वचषक जिंकणारा गोलरक्षक फुटबॉलपटू इकर कॅसिलासने निवृत्तीची घोषणा केली आहे.

स्पेनचा विश्वचषक जिंकणारा गोलरक्षक फुटबॉलपटू इकर कॅसिलासने निवृत्तीची घोषणा केली आहे. इकर कॅसिलास मागील एक वर्षांपेक्षा अधिक काळ हृदयविकाराच्या समस्येमुळे फुटबॉलच्या मैदानापासून दूर होता. त्यानंतर अखेर आज मंगळवारी कॅसिलासने सोशल मीडियाच्या माध्यमातून फुटबॉल मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. 

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

इकर कॅसिलासने आज सोशल मीडियाच्या ट्विटरवर निवृत्ती जाहीर करताना, आज माझ्या क्रीडा जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा आणि कठीण दिवस असल्याचे म्हटले आहे. व योसोबतच आता मैदानापासून कायमचा निरोप घेण्याची वेळ आली असल्याचे कॅसिलासने या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. इकर कॅसिलासने आपल्या कारकिर्दीत दोनदा युरोपियन चँपियनशिपवर मोहोर उठवली. ज्यामध्ये रिअल माद्रिदसाठी 700 हून अधिक खेळांचा समावेश आहे. 2015 मध्ये इकर कॅसिलासने रिअल माद्रिद संघाला सोडचिठ्ठी देत, पोर्तुगीजच्या पोर्तो संघामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी 2019 च्या मे मध्ये कॅसिलासला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तो फुटबॉलच्या मैदानापासून दूर होता.

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

इकर कॅसिलासने 167 सामन्यात स्पेनचे प्रतिनिधित्व केले. ज्यामध्ये 2010 चा वर्ल्ड कप आणि 2008 व  2012 मधील युरोकप स्पॅनिश संघाने जिंकला होता. याशिवाय पाच लि लीगा आणि तीन चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे खिताब मिळवण्यात कॅसिलासचा मोलाचा वाटा राहिला आहे. इकर कॅसिलासच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर रिअल माद्रिद क्लबने, रियल माद्रिद आणि स्पॅनिश फुटबॉल संघाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक असल्याचे म्हटले आहे. व कॅसिलास वयाच्या 9 व्या वर्षी रिअल माद्रिद मध्ये सामील झाल्याचे सांगून, 25 वर्षे  रिअल माद्रिदच्या शर्टचा मैदानावर बचाव केला असल्याचे म्हटले आहे.             


​ ​

संबंधित बातम्या