सुपर लीगमध्ये गेल्यास थेट बडतर्फीच करणार; इटलीच्या फुटबॉल संघटनेचा इशारा

यूएनआय
Wednesday, 28 April 2021

सुपर लीगद्वारे आपली कोंडी करण्याचा आघाडीच्या क्लबनी प्रयत्न केल्यामुळे इटली फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी इटली संघटना, युरोपिय तसेच जागतिक महासंघाची मान्यता नसलेल्या लीगमध्ये सहभागी केल्यास बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रिकेट  रोम - सुपर लीगद्वारे आपली कोंडी करण्याचा आघाडीच्या क्लबनी प्रयत्न केल्यामुळे इटली फुटबॉल संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी इटली संघटना, युरोपिय तसेच जागतिक महासंघाची मान्यता नसलेल्या लीगमध्ये सहभागी केल्यास बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंटर मिलान, युव्हेंटिस तसेच एसी मिलान या इटलीतील संघाचा सुपर लीग स्थापनेत सहभाग होता. आता त्यांनी माघार घेतली आहे, पण सुपर लीगच्या करारातून बाहेर पडता येत नाही याकडे काही दिवसांपूर्वीच रेयाल माद्रिदने लक्ष वेधले आहे. युव्हेंटिसने नव्या स्वरूपात लीग सुरू होऊ शकते असे संकेत दिले आहेत, या पार्श्वभूमीवर इटली महासंघाचा इशारा मोलाचा आहे.

सुपर लीगमध्ये कोण आहे आणि कोण नाही याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. आम्ही क्लबच्या लायसन्सबाबत निर्णय घेतला आहे. २१ जूनपर्यंत क्लबनी आपण कोणत्या लीगमध्ये असावे हा निर्णय घ्यायचा आहे. खासगी स्पर्धेत खेळायचे असेल तर आमची मान्यता असलेल्या लीगमध्ये खेळता येणार नाही ,असे इटली फुटबॉल संघटनेने स्पष्ट केले.

एसी मिलानचा पराभव
जोक्विन कॉरिआ याच्या दोन गोलमुळे लाझिओने सिरी ए फुटबॉलमध्ये एसी मिलानला ३-० असा पराभव केला. कॉरिआ याने पहिला गोल ७७ व्या सेकंदासच केला होता. दरम्यान, विजयामुळे लाझिओच्या चॅम्पियन्स लीग पात्रतेच्या आशा उंचावल्या. चौथ्या क्रमांकावरील संघापासून लाझिओ पाच गुण दूर असले तरी ते एक सामना कमी खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील नापोलीने तॉरिनोस २-० असे हरवले.


​ ​

संबंधित बातम्या