ईपीएल : फुटबॉलपटूंनों भानावर या! चौघांकडून कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 3 January 2021

ब्रिटन मध्ये कोरोना विषाणूची नवी स्ट्रेन सापडल्यानंतर स्थानिक प्रशासनाने नवे निर्बंध जाहीर केले आहेत. आणि या निर्बंधांदरम्यान इंग्लंड प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत खेळत असलेल्या चार खेळाडूंनी जैवसुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. हे चारही खेळाडू टोटेनहॅम आणि वेस्टहॅम संघातील असल्याची माहिती मिळाली आहे. 
 
या दोन्ही संघातील खेळाडूंनी एकत्र येत इतरांना देखील सोबत घेऊन पार्टी केल्यामुळे टॉटेनहॅम आणि वेस्टहॅम क्लबनी या घटनेवर कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या खेळाडूंनी सोशल मीडियावर पार्टीचे फोटो शेअर केल्यानंतर ही घटना समोर आली असून, फोटोमध्ये टोटेनहॅमचा एरिक लामेला, सर्जिओ रेगुइलेन आणि जिओव्हनी लो सेल्सो आणि वेस्टहॅमचा मॅन्युअल लान्झिनी घरात इतरांसमवेत पार्टी करत असल्याचे दिसते. यानंतर टोटेनहॅम क्लबने निवेदन देत, फोटो पाहून निराश झाल्याचे म्हटले आहे. तसेच या फोटोचा निषेध करत असल्याचे देखील क्लबने आपल्या निवेदनात नमूद केले. 

क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या

ब्रिटन मध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे नागरिकांना एकमेकांच्या घरी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या ईपीएल हंगामात कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आल्यामुळे तीन सामने रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली होती.         

​ ​

संबंधित बातम्या