i league : विजेतेपदासाठी तिरंगी जुगलबंदी

दीपक कुपन्नावर 
Wednesday, 24 March 2021

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी 14 व्या हंगामातील आय लिग बायोबबल वातावरणात अकरा संघात विनाप्रेक्षक सुरु आहे.

भारतीय फुटबॉलमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) स्पर्धेच्या विजेतेपदाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. गोव्याचा चर्चिल ब्रदर्स, केरळाचा गोकुलम एफसी आणि मणिपूरचा टिडिडम रोड अँथलेटिक युनियन ( ट्राऊ ) या तीन संघात जुगलबंदी रंगली आहे. कोलकत्यात शनिवारी (ता. 27) होणाया सामन्यातून या विजेतेपदाचा फैसला होणार आहे. या तिन्हीं संघानी प्रत्येकी 14 सामने खेळून समान 26 गुण कमाविले आहेत. त्यामुळेच शेवटच्या फेरीकडे संपुर्ण भारतीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागून आहे. 

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी 14 व्या हंगामातील आय लिग बायोबबल वातावरणात अकरा संघात विनाप्रेक्षक सुरु आहे. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात असून कोणत्याच संघाला एकतर्फी वर्चस्व ठेवता न आल्याने विजेतेपदासाठी रंगत वाढली आहे. यात सर्वाधिक संधी गोकुलम केरळा एफसीला आहे. कारण, शेवटच्या ट्राऊ संघाविरूध्द बरोबरी देखील या संघाला विजेतेपदासाठी पुरेशी आहे. चर्चिल ब्रदर्स, ट्राऊ संघाविरूध्द या संघाने पहिल्या ठप्यात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळेच समान गुण असुनही हा संघ गुणतक्यात पहिला स्थानावर झेपावला आहे. स्पर्धेत 10 गोल नोंदविणारा या संघाचा स्ट्रायकर डेनी अँन्टवा (घाना) यांच्यावर भिस्त आहे.

"मैदानात कोहली अंपायर्सचा अपमान करतो"

तुलनेत ट्राऊ संघाने देखील युवा स्ट्रायकर खंगकाम बिद्यासागरसिंगने नोंदविलेल्या 11 गोलच्या जोरावर मुसंडी मारली आहे. त्यामुळे गोकुलमचा पाडाव करीत ऐझवाल एफसीनंतर आय़ लिग करंडक पटकावित ट्राऊ पुन्हा ईशान्येची गुणवत्ता अधोरेखित करणार काय याकडे लक्ष वेधून आहे. माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला गोकुलम विरुध्द ट्राऊ संघातील सामन्यावर अंवलबून रहावे लागणार आहे. हा सामना बरोबरी सुटल्यास चर्चिलला अधिक गोलने पंजाब एफसीला नमवावे लागेल. तरच त्यांचे आय लिग विजेतेपदाच्या हँट्रटीकचे स्वप्न साकारु शकेल. सुमार कामगिरी करणारा मणिपूरच्या नेराँका एफसीची व्दितिय श्रेणीत गच्छंती निश्चित झाली आहे.  

नवा विजेता?

विजेतेपदासाठी दावेदार मानल्या जाणाया संघात केवळ चर्चिल ब्रदर्स यापुर्वी दोनदा विजेता ठरला आहे.  स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणारा ट्राऊ संघ आणि गोकुलम प्रथमच विजेतेपदाच्या समीप पोहचल्याने सर्वस्वपणाला लावतील यात शंका नाही. त्यामुळे यंदा आय लिगला नवा विजेता मिळणार की पारंपारिक गोवा बाजी मारणार याचीच फुटबाँल शौकींनाना उत्सुकता लागुन राहिली आहे.


​ ​

संबंधित बातम्या