सर्वांचे मनापासून आभार; एरिक्सनकडून जगभारातील चाहत्यांना संदेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 June 2021

युरो फुटबॉल स्पर्धेत सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सन याची प्रकृती सुधारत आहे. स्मितहास्य असलेला सेल्फी पोस्ट करून जगभगातील असंख्य चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.

कोपनहेगन - युरो फुटबॉल स्पर्धेत सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवणारा डेन्मार्कचा फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सन याची प्रकृती सुधारत आहे. स्मितहास्य असलेला सेल्फी पोस्ट करून जगभगातील असंख्य चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत.

युरो स्पर्धेत शनिवारी डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यात सामना सुरू असताना डेन्मार्कचा प्रथितयश फुटबॉलपटू एरिक्सनला खेळता खेळता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तो खाली पडला. 

काही काळासाठी त्याचे हृदय बंद पडले होते. मैदानावरच उपचार मिळाल्यामुळे त्याचा श्वासोच्छ्‍वास पुन्हा सुरू झाला आणि त्याला जीवदान मिळाले. ही घटना थेट पाहणारे जगभरातील असंख्य चाहते हळहळले होते.

त्याच्या अजून इतरही चाचण्या होणार असल्यामुळे तो काही दिवस रुग्णालयात राहणार आहे. मला शुभेच्छा देणाऱ्या जगभरातील तमाम चाहत्यांचे खूप खूप आभार, तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी लाखमोलाच्या आहेत, असा संदेश एरिक्सनने छायाचित्राबरोबर लिहिला आहे.


​ ​

संबंधित बातम्या