सुनील छेत्रीने भारतीय संघात केले पुनरागमन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 May 2021

सुनील छेत्रीने विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. विश्वकरंडक पात्रतेची आशा संपलेला भारतीय संघ या स्पर्धेद्वारे आशियाई पात्रता साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मुंबई - सुनील छेत्रीने विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. विश्वकरंडक पात्रतेची आशा संपलेला भारतीय संघ या स्पर्धेद्वारे आशियाई पात्रता साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे संघात अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. 

कोरोना महामारीमुळे पात्रता स्पर्धेतील भारताच्या गटातील उर्वरित सर्व लढती कतारला होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ दोहा येथे रवाना झाला आहे. विलगीकरणात असतानाच भारतीय संघ सराव करेल. भारताची पहिली लढत ३ जूनला आहे. भारताची त्यानंतर बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध लढत होईल.


​ ​

संबंधित बातम्या