स्पॅनिश फुटबॉल लीग विजेतेपद ॲटलेटिकोच्या आवाक्यात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 May 2021

अॅटलेटिको माद्रिदने ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल लीग विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना रेयाल सोशिएदादला २-१ असे पराजित केले. भक्कम बचावात्मक खेळाच्या जोरावर अॅटलेटिकोने बाजी मारली.

माद्रिद - अॅटलेटिको माद्रिदने ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल लीग विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकताना रेयाल सोशिएदादला २-१ असे पराजित केले. भक्कम बचावात्मक खेळाच्या जोरावर अॅटलेटिकोने बाजी मारली. 

यान्निक कॅरास्को आणि अँगेल कॉरिया यांनी गोल करीत अॅटलेटिकोस विश्रांतीला आघाडीवर नेले. सोशिएदादने उत्तरार्धात अॅटलेटिकोचा कस पाहिला, पण भरवशाची बचावफळी कोलमडली नाही. पूर्वार्धात संधी दवडल्या नसत्या तर कोणावरच दडपण आले नसते, असे अॅटलेटिकोचे मार्गदर्शक दिएगो सिमॉन यांनी सांगितले. 

या विजयामुळे अॅटलेटिकोने बार्सिलोनास चार गुणांनी, तर रेयाल माद्रिदला पाच गुणांनी मागे टाकले. अर्थात रेयाल माद्रिद ग्रॅनाडास हरवून आपले स्थान नक्कीच उंचावून शकेल. रेयाल ही लढत जिंकू शकले नाहीत, तर अॅटलेटिको ओसासुनाला पराजित करून जेतेपद निश्चित करू शकतील. अॅटलेटिकोच्या विजयामुळे सेविला आता त्यांना मागे टाकू शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 

युव्हेंटिसच्या आशा कायम
रोम - ख्रिस्तियानो रोनाल्डो तसेच पाओला दिबाला यांनी युव्हेंटिसकडून खेळतानाचे गोलांचे शतक पूर्ण केले, तसेच तुरीनविरुद्ध संघाला ३-१ असे विजयी केले. त्यामुळे युव्हेंटिसच्या अव्वल चार संघात स्थान मिळवण्याच्या आशा कायम राहिल्या.


​ ​

संबंधित बातम्या