सहा खेळाडूंना कोरोना, तरी कोरिया सामन्यासाठी आग्रही

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

कोरिया कतारविरुद्धच्या लढतीसाठी आग्रही आहे. एका गोलरक्षकासह तेरा खेळाडू तंदुरुस्त असल्यास आम्ही खेळण्यास तयार आहोत, असे कोरिया सांगत आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 
 
सोल :  कोरोना आक्रमणाचा जागतिक फुटबॉलला फटका बसत आहे. दक्षिण कोरिया संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची कतारविरुद्धची लढत रद्द होण्याची चिन्हे दिसत आहेत, पण या लढतीसाठी कोरिया आग्रही आहे.

कोरिया संघातील सहा खेळाडू, तसेच सपोर्ट स्टाफमधील एकास मेक्‍सिकोविरुद्धच्या सामन्यापूर्वी  कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही ही लढत झाली. त्यात कोरिया २-३ पराभूत झाले. कोरिया संघ ऑस्ट्रियात सराव लढती खेळत आहे. सामन्यापूर्वी वीस तास त्यांना चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील एकास कोरोनाची बाधा असल्याचे समजले. सामनापूर्व चाचणीत अन्य दोघांना बाधा झाली असल्याचे समजले. त्यानंतरही लढत झाली. त्यापूर्वी कोरिया, मेक्‍सिको आणि ऑस्ट्रिया पदाधिकाऱ्यांत दीर्घ चर्चा झाली.

कोरिया कतारविरुद्धच्या लढतीसाठी आग्रही आहे. एका गोलरक्षकासह तेरा खेळाडू तंदुरुस्त असल्यास आम्ही खेळण्यास तयार आहोत, असे कोरिया सांगत आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. 
 
​ ​

संबंधित बातम्या