रोनाल्डोचे दोन गोल, पण युव्हेंटिसचे जेतेपद दुरावले

पीटीआय
Tuesday, 4 May 2021

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटिसने सिरी ए फुटबॉल साखळीत उदीनीसचा २-१ असा पराभव केला, पण युव्हेंटिसच्या विजयापूर्वीच इंटर मिलानने सिरी ए विजेतेपद निश्चित केले होते.

पॅरिस - ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे युव्हेंटिसने सिरी ए फुटबॉल साखळीत उदीनीसचा २-१ असा पराभव केला, पण युव्हेंटिसच्या विजयापूर्वीच इंटर मिलानने सिरी ए विजेतेपद निश्चित केले होते. ॲटलांटाला सासुओलो संघाने १-१ असे रोखल्यामुळे इंटर मिलानची १३ गुणांची आघाडी कोणीही भेदू शकणार नाही हे स्पष्ट झाले.

यापूर्वी ॲटलांटाने क्रॉतोनेचा २-० असा पाडाव केल्यामुळे युव्हेंटिसच्या सलग दहावे जेतेपद जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.


​ ​

संबंधित बातम्या