सिरी-ए लीग : रोनाल्डोच्या सलग गोलने युव्हेंट्सचा परमावर दमदार विजय   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या दमदार गोलमुळे युव्हेंट्सच्या संघाने परमावर धमाकेदार विजय मिळवलेला आहे.

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या दमदार गोलमुळे युव्हेंट्सच्या संघाने परमावर धमाकेदार विजय मिळवलेला आहे. युव्हेंट्स आणि परमा यांच्यात आज झालेल्या सामन्यात युव्हेंट्स संघाने परमाचा 4 - 0 च्या फरकाने पराभव केला आहे. आणि या विजयासह ख्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा आपल्या टीकाकारांना आपल्या खेळाच्या मदतीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बार्सिलोना सोबतच्या सामन्यापूर्वी ख्रिस्टियानो रोनाल्डोला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. व त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात येत होती. मात्र बार्सिलोना विरुद्धच्या सामन्यात त्याने चांगले प्रदर्शन करत पेनल्टी गोल केले होते. तर आजच्या सामन्यात त्याने पेनल्टीचा सहारा न घेता गोल केले. 

रोनाल्डो, मेस्सीला मागे टाकत लेवान्डोव्हस्कीने मारली बाजी   

युव्हेंट्स आणि परमा यांच्यात झालेल्या सामन्यात, युव्हेंट्स संघाच्या देजान कुलुसेव्हस्कीने सामन्याच्या पहिल्या सत्रातील 23 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर याच्या तीन मिनिटानंतर ख्रिस्टियानो रोनाल्डोने आपला पहिला गोल आणि 48 व्या मिनिटाला दुसरा गोल करून युव्हेंट्स संघाला 3 - 0 अशी बढत मिळवून दिली. अल्वेरो मोरॅटोने 85 व्या मिनिटाला एक गोल केला. त्यामुळे सामना संपण्यापूर्वी युव्हेंट्स संघाने परमावर 4 - 0 चा गोल फरक केला होता. व ही बढत युव्हेंट्सच्या संघाने कायम राखल्याने त्यांनी परमा संघावर सहज विजय मिळवत क्रमवारीत तिसरे स्थान मिळवले आहे. 

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत एसी मिलानच्या संघाने 13 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत 31 अंकांसह पहिले स्थान काबीज केले आहे. त्यानंतर इंटर मिलानच्या संघाने देखील 13 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. मात्र त्याने 30 अंक असल्यामुळे ते दुसऱ्या नंबरवर आहेत. यानंतर युव्हेंट्सचा संघ 27 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर रोमाचा संघ चौथ्या आणि नापोलीचा संघ पाचव्या स्थानावर आहेत.            


​ ​

संबंधित बातम्या