सिरी ए फुटबॉल लीग : रोनाल्डोच्या दोन गोलने जुव्हेंटसचा दमदार विजय 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत जुव्हेंटस संघाने कागलियरीवर दमदार विजय मिळवलेला आहे.

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत जुव्हेंटस संघाने कागलियरीवर दमदार विजय मिळवलेला आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोल मुळे जुव्हेंटस संघाला कागलियरीवर सहज विजय मिळवता आला. व त्यासोबतच रोनाल्डोने मागील पाच सामन्यांमध्ये मिळून आता आठ गोल केले आहेत.  

कागलियरी आणि जुव्हेंटस यांच्यात झालेल्या सामन्यात, खेळाच्या पहिल्या सत्रात जुव्हेंटस संघाच्या रोनाल्डोने 38 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. व या गोलच्या चौथ्या मिनिटानंतर लगेचच म्हणजे 42 व्या मिनिटाला रोनाल्डोने अजून एक गोल नोंदवला. त्यानंतर सामन्यात कागलियरी एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे जुव्हेंटस संघाने कागलियरीवर 2-0 ने विजय मिळवला. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : न्यू कॅसलवर विजय मिळवत चेल्सी दुसऱ्या स्थानी झेप  

या विजयानंतर जुव्हेंटस संघाचे प्रशिक्षक अँड्रिया पिर्लो यांनी ख्रिस्टियानो रोनाल्डोचे कौतुक केले आहे. जेव्हा रोनाल्डोसारखा चॅम्पियन संघात असेल तेव्हा आपण कोणताही निकाल मिळवू शकतो. व रोनाल्डो प्रत्येकासाठी एक उदाहरण आहे आणि त्यांने आपला दर्जेदार खेळ सुरूच ठेवावा, असे पिर्लो यांनी म्हटले आहे. याशिवाय कागलियरी विरुद्धच्या सामन्यात पहिल्या मिनिटापासून चांगला खेळ दाखवल्याचे आणि सामन्यावर वर्चस्व राखल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सिरी ए लीगच्या क्रमवारीत 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवून 18 अंकांसह सोसूंलोचा संघ पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर मिलानचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. मिलानच्या संघाने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. रोमा तिसऱ्या स्थानी असून, त्यांचे 17 गुण आहेत. तर जुव्हेंटसच्या संघाने 8 पैकी चार सामन्यात विजय मिळवलेला आहे. आणि त्यांचे 16 अंक असून, ते चौथ्या स्थानावर आहेत. व 15 अंकांसह इंटर मिलानचा संघ पाचव्या स्थानी आहे.   

 


​ ​

संबंधित बातम्या