सिरी-ए फुटबॉल लीग : मिलानच्या राफेल लिओने काही सेकंदात गोल करत रचला विक्रम   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Tuesday, 22 December 2020

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत मिलानच्या संघातील राफेल लिओने सासुओलो संघाविरुद्ध अवघ्या सहा सेकंदात गोल करण्याचा पराक्रम केला.

सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत मिलानच्या संघातील राफेल लिओने सासुओलो संघाविरुद्ध अवघ्या सहा सेकंदात गोल करण्याचा पराक्रम केला. त्याच्या या गोलमुळे इटलीच्या टॉप स्थानिक लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. सासुओलो सोबतचा सामना सुरु झाल्यानंतर राफेल लिओने काही वेळेच्या आतच गोल केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू देखील आश्चर्यचकित झाले. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : मँचेस्टर युनायटेडचा लीड्सवर धमाकेदार विजय  

मिलान आणि सासुओलो यांच्यातील सामन्यात राफेल लिओने सहा सेकंदात गोल करून, पाओलो पोगीचा आठ सेकंदाचा विक्रम मागे टाकला आहे. पियेंझाचा खेळाडू असलेल्या पाओलो पोगीने 2001 मध्ये फिओरेन्टीना विरुद्ध आठ सेकंदात गोल केला होता. पाओलो पोगीच्या नंतर ऍलेक्सिस सेलमकर्सने 26 व्या मिनिटाला गोल करत, मिलान संघाला बढत मिळवून दिली. तर डॉमिनिक बेरार्डीने 89 व्या मिनिटाला सासुओलो संघाकडून एकमेव गोल केला. त्यामुळे ए सी मिलानच्या संघाने सासुओलोवर 2 - 1 ने विजय मिळवत सिरी-ए च्या क्रमवारीतील आपले पहिले स्थान पक्के केले आहे. 

सिरी-ए लीग : रोनाल्डोच्या सलग गोलने युव्हेंट्सचा परमावर दमदार विजय   

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत ए सी मिलानच्या संघाने 13 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवत 31 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर इंटर मिलानच्या संघाने देखील 13 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. मात्र त्यांचे 30 अंक असल्यामुळे ते दुसऱ्या नंबरवर आहेत. यानंतर युव्हेंट्सचा संघ 27 गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर रोमाचा संघ चौथ्या आणि नापोलीचा संघ पाचव्या स्थानावर आहेत.  

          


​ ​

संबंधित बातम्या