सिरी ए फुटबॉल लीग : टोरिनोवर मात करत मिलान क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत मिलान संघाने टोरिनो संघावर विजय मिळवलेला आहे.

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत मिलान संघाने टोरिनो संघावर विजय मिळवलेला आहे. मिलान आणि टोरिनो यांच्यात आज झालेल्या सामन्यात मिलान संघाने टोरिनोचा 2 - 0 ने पराभव केला. व यासह मिलानच्या संघाने स्पर्धेतील आपला बारावा विजय मिळवत क्रमवारीतील आपले पहिले स्थान अधिक पक्के केले आहे. 

कोरोनामुळे कोपा फुटबॉल स्पर्धेतील सेमीफायनल सामना स्थगित  

मिलान आणि टोरिनो यांच्यात झालेल्या सामन्यात, मिलान संघाच्या राफेल लिओने खेळाच्या पहिल्या सत्रात 25 व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फ्रँक कैसीने 36 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून मिलान संघाला बढत मिळवून दिली. ही बढत मिलानच्या संघाने शेवटपर्यंत टिकवून धरत सामना आपल्या खिशात घातला. टोरिनो संघाला मिलान विरुद्ध एकही गोल करता आला नाही. व त्यामुळे मिलानच्या संघाने टोरिनोवर 2 - 0 ने विजय मिळवला. 

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत मिलानच्या संघाने 17 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवत 40 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर इंटर मिलानचा  संघ दुसऱ्या स्थानी आहे. इंटर मिलान संघाने 17 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांचे 37 अंक आहेत. यानंतर 34 अंकांसह रोमाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर अटलांटाचा संघ चौथ्या नंबरवर पोहचला आहे. अटलांटाच्या संघाने 16 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. व त्यांचे 31 गुण झाले आहेत. यानंतर युव्हेंट्सचा संघ 30 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे.        


​ ​

संबंधित बातम्या