सिरी ए फुटबॉल लीग : फेडरिकोच्या गोलने यूव्हेन्टसचा मिलानवर दमदार विजय 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने मिलानवर विजय मिळवत क्रमवारीत एका स्थानाची उडी घेतली आहे.

सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने मिलानवर विजय मिळवत क्रमवारीत एका स्थानाची उडी घेतली आहे. आणि यासह यूव्हेन्टसच्या संघाने मागील सलग 27 सामन्यांमध्ये जिंकत चाललेल्या मिलानचा विजयीरथ थांबवला आहे. यूव्हेन्टस आणि मिलान यांच्यात आज झालेल्या सामन्यात यूव्हेन्टसने मिलानचा 3 - 1 ने पराभव केला आहे. 

ईपीएल : डॅनीच्या एकमेव गोलमुळे साऊथहॅम्पटनचा लिव्हरपूलवर विजय  

यूव्हेन्टस आणि मिलान यांच्यात झालेल्या सामन्यात यूव्हेन्टसच्या फेडरिको चिसाने दोन गोल नोंदवले. त्याने खेळाच्या पहिल्या सत्रात 18 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. तर दुसरा गोल सामन्याच्या दुसऱ्या सत्रात 62 व्या मिनिटाला केला. त्यानंतर वेस्टन मॅकॅनीने 76 व्या मिनिटाला गोल करून यूव्हेन्टस संघाला बढत मिळवून दिली. तर मिलान संघाकडून एकमेव गोल डेव्हिड कॅलेब्रियाने 41 व्या मिनिटाला केला. त्यामुळे यूव्हेन्टसच्या संघाला क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या मिलानला सहजरित्या पराभूत केले. 

दरम्यान, सिरी-ए फुटबॉल क्रमवारीत मिलानच्या संघाने 16 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 37 अंकांसह पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर इंटर मिलानचा  संघ दुसऱ्या स्थानी आहे. इंटर मिलान संघाने 16 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. त्यामुळे त्यांचे 36 अंक आहेत. यानंतर 33 अंकांसह रोमाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर यूव्हेन्टसचा संघ आता चौथ्या नंबरवर पोहचला आहे. यूव्हेन्टसच्या संघाने 15 पैकी 8 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. व त्यांचे 30 गुण झाले आहेत. यानंतर सोसुलोचा संघ 29 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे. 


​ ​

संबंधित बातम्या