क्रोएशियातील क्लबकडून संदेश झिंगन करारबद्ध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 August 2021

भारताचा अनुभवी फुटबॉलपटू संदेश झिंगन याला क्रोएशियातील अव्वल साखळी स्पर्धेत खेळणाऱ्या एचएनके सिबेनिक संघाने करारबद्ध केले आहे. त्यामुळे आगामी देशांतर्गत फुटबॉल मोसमात तो कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाकडून खेळणार नाही.

पणजी - भारताचा अनुभवी फुटबॉलपटू संदेश झिंगन याला क्रोएशियातील अव्वल साखळी स्पर्धेत खेळणाऱ्या एचएनके सिबेनिक संघाने करारबद्ध केले आहे. त्यामुळे आगामी देशांतर्गत फुटबॉल मोसमात तो कोलकात्याच्या एटीके मोहन बागान संघाकडून खेळणार नाही.

क्रोएशियातील क्लबकडून व्यावसायिक करार मिळालेला २८ वर्षीय झिंगन भारताचा पहिला फुटबॉलपटू आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने गतमहिन्यात बचावपटू झिंगनची २०२०-२१ मोसमातील सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटू पुरस्कारासाठी निवड केली होती.

चंडीगडमधील सेंट स्टीफन्स फुटबॉल अकादमीतर्फे युवा कारकिर्दीस सुरुवात केलेल्या झिंगनने २०११ मध्ये युनायटेड सिक्कीम संघातर्फे देशातील सीनियर फुटबॉलमध्ये पदार्पण केले. २०१४ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी तो इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. २०१५ मध्ये त्याने फिफा विश्वकरंडक (२०१८) स्पर्धेच्या पात्रता फेरीत नेपाळविरुद्धच्या लढतीत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आयएसएल स्पर्धेत झिंगन सहा वर्षे खेळला. या कालावधीत केरळा ब्लास्टर्सने दोन वेळा स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. २०२० मध्ये त्याने एटीके मोहन बागानशी करार केला; पण दुखापतीमुळे तो मोसमास मुकला.

मी कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जेथे मी स्वतःची शक्य तितक्या उच्च स्तरावर चाचणी करण्यास इच्छुक आहे, असे झिंगम म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या