विलगीकरण भंगाबद्दल रोनाल्डाला आर्थिक दंड?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

विलगीकरणात असतानाही पोर्तुगालकडून खेळण्यासाठी रवाना झाल्याबद्दल, तसेच कोरोना असताना इटलीत परतल्याबद्दल रोनाल्डोविरुद्ध कारवाई होऊ शकेल, असे संकेत इटलीच्या क्रीडामंत्र्यांनी दिले.

रोम : विलगीकरणात असतानाही पोर्तुगालकडून खेळण्यासाठी रवाना झाल्याबद्दल, तसेच कोरोना असताना इटलीत परतल्याबद्दल रोनाल्डोविरुद्ध कारवाई होऊ शकेल, असे संकेत इटलीच्या क्रीडामंत्र्यांनी दिले.

रोनाल्डोने विलगीकरणातून बाहेर पडताना तसेच पुन्हा तुरिनला परतताना आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसेल, तर त्याने नक्कीच इटलीतील कोरोना नियमाचा भंग केला आहे. याबाबतचे नियम क्रीडा संघटना तसेच क्‍लबनी तयार केले आहेत, असे इटलीचे क्रीडामंत्री व्हिन्सेंझो स्पॅदाफोरा यांनी सांगितले. त्यामुळे विलगीकरणात असतानाही पोर्तुगालकडून खेळण्यास गेल्यामुळे रोनाल्डोला आर्थिक दंड होऊ शकेल. 

युव्हेंटिस संघातील दोघा सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संघास विलगीकरणात जाण्याची सूचना होती. संघातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली; पण त्याच्या निकालापूर्वीच रोनाल्डो पोर्तुगालकडून खेळण्यासाठी रवाना झाला होता.


​ ​

संबंधित बातम्या