रोनाल्डोनं गाठलं विक्रमाचं नवं शिखर; शर्यतीत मेस्सी खूप मागे पडलाय

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

रोनाल्डोने या सामन्यात एक गोल डागला. या एका गोलसह व्यावसायिक फुटबॉलच्या मैदानात त्याच्या नावे 760 गोलची नोंद झाली आहे.

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने एका मोठ्य़ा विक्रमाला गवसणी घातलीय.  इटालियन कपमध्ये जुवेंटस संघाकडून खेळताना त्याने फुटबॉल जगतातील महान खेळाडू असलेल्या पेलेंचा विक्रम मागे टाकलाय. सध्याच्या घडीला रोनाल्डो भारी की लियोनेल मेस्सी भारी अशी चर्चा नेहमीच रंगते. रोनाल्डो गोल करण्याच्या बाबतीत मेस्सीवर भारी पडताना दिसतोय.  मंगळवारी  रोनाल्डोने केलेल्या गोलच्या मदतीने जुवेंट्सने नेपोलीचा 2-0 असा पराभव केला. या विजयासह जुवेंट्सने विक्रमी 9 वेळा इटालियन सुपर कप स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

रोनाल्डोने या सामन्यात एक गोल डागला. या एका गोलसह व्यावसायिक फुटबॉलच्या मैदानात त्याच्या नावे 760 गोलची नोंद झाली आहे. फुटबॉल जगतात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोनाल्डो अव्वल स्थानावर पोहचलाय. त्याने चेक प्रजासत्ताक फुटबॉल संघाच्या जोसेफ बिकानला मागे टाकत रोनाल्डने अव्वलस्थान पटकावले.  
बिकान याच्या नावे 759 गोल आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या खात्यावर 757 गोलची नोंद आहे. अर्जेंटिनाटचा स्टार फुटबॉलपटू आणि बार्सिलोनाचा स्ट्रायकर मेस्सी या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. मेस्सीने आतापर्यंत 719 गोल डागले आहेत.  

IPL 2021 : लिलावा आधी फ्रँचायझींची खेळी; जाणून घ्या रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी

जुवेंट्सने 2020-21 पूर्वी 1995, 1997, 2002, 2003, 2012, 2013, 2015, 2018 मध्ये इटालियन कप स्पर्धेत जेतेपद मिळवले आहे.  रोनाल्डोने सामन्यातील 64 व्या मिनिटात गोल डागला. या गोलसह संघाला त्याने बढत मिळवून दिली. नेपोलीच्या संघाला त्यांची बरोबरी करण्याची संधी मिळाली होती. पण कप्तान लोरेंजो इनसायनने अखेरच्या टप्प्यात पेनल्टीवर गोल डागल्याची संधी गमावली. दुसरीकडे इंज्युरी टाइमच्या पाचव्या मिनिटाला जुवेंट्सने दुसरा गोल डागत विजयावर निश्चित केला.  भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या