रोनाल्डो-बेनझेमा ‘बरोबरी’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 June 2021

करीम बेनझेमाने चमकदार गोल करीत युरो फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगालविरुद्धच्या लढतीत जगज्जेत्या फ्रान्सला आघाडीवर नेले, पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन पेनल्टी किक सत्कारणी लावत गतविजेत्या पोर्तुगालला २-२ बरोबरीत रोखले, तसेच बाद फेरीतील प्रवेश साध्य करून दिला.

बुडापेस्ट - करीम बेनझेमाने चमकदार गोल करीत युरो फुटबॉल स्पर्धेतील पोर्तुगालविरुद्धच्या लढतीत जगज्जेत्या फ्रान्सला आघाडीवर नेले, पण ख्रिस्तियानो रोनाल्डोने दोन पेनल्टी किक सत्कारणी लावत गतविजेत्या पोर्तुगालला २-२ बरोबरीत रोखले, तसेच बाद फेरीतील प्रवेश साध्य करून दिला.

आपला पाच वर्षांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा दुष्काळ संपवण्याचा फ्रान्स संघव्यवस्थापनाचा निर्णय बेनझेमाने योग्य ठरवत होता, पण रोनाल्डोचीच कामगिरी जास्त लक्षवेधक ठरली. त्याने केवळ पोर्तुगालची हार टाळली नाही, तर त्याचबरोबर इराणच्या अली दाएई यांच्या १०९ गोलांची बरोबरी साधून दिली. सामन्यातील तीनपैकी पहिली पेनल्टी किक रोनाल्डोने ३१ व्या मिनिटास सत्कारणी लावली, तर बेनझेमाने पूर्वार्धातील भरपाई वेळेत पेनल्टी किकवर गोल केला. बेनझेमाने उत्तरार्धाच्या सुरुवातीस फ्रान्सला आघाडीवर नेले, त्यावेळी जगज्जेते २०१६ च्या स्पर्धेतील पराभवाचे उट्टे काढणार असेच वाटत होते, पण रोनाल्डोने बरोबरी साधली. फ्रान्सचे यानंतरचे गोलचे प्रयत्न विफल ठरल्याने पोर्तुगालने बाद फेरी गाठली. 

रोनाल्डो पोर्तुगालच्या विजयात मोलाचा असतो, तितकाच पेपे असतो हेही दिसले. पेपेने फ्रान्सचा अव्वल खेळाडू एम्बापे याची चांगलीच कोंडी केली. 

युरोतील नॉकआऊट
उपउपांत्यपूर्व फेरी

२६ जून - वेल्स वि. डेन्मार्क (रात्री ९.३०), इटली वि. ऑस्ट्रिया (मध्यरात्री १२.३०)
२७ जून - नेदरलँड््स वि. चेक प्रजासत्ताक (रात्री ९.३०), बेल्जीयम वि. पोर्तुगाल (रात्री १२.३०)
२८ जून - क्रोएशिया वि. स्पेन (रात्री ९.३०), फ्रान्स वि. स्वित्झर्लंड (मध्यरात्री १२.३०)
२९ जून - इंग्लंड वि. जर्मनी (रात्री ९.३०), स्वीडन वि. युक्रेन (मध्यरात्री १२.३०)

उपांत्यपूर्व फेरी
२ जुलै - फ्रान्स x स्वित्झर्लंड वि. क्रोएशिया x स्पेन (रात्री ९.३०). बेल्जीयम x पोर्तुगाल वि. इटली x ऑस्ट्रिया (मध्यरात्री १२.३०)
३ जुलै - नेदरलँड््स x चेक प्रजासत्ताक वि. वेल्स x डेन्मार्क (रात्री ९.३०). स्वीडन x युक्रेन वि. इंग्लंड x जर्मनी (मध्यरात्री १२.३०)
उपांत्य लढती - ६ आणि ७ जुलै (मध्यरात्री १२.३०), 
अंतिम लढत - ११ जुलै (मध्यरात्री १२.३०)


​ ​

संबंधित बातम्या