रोनाल्डोच्या कृतीने कोका कोलाला बसला ४ अब्ज डॉलरचा फटका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 June 2021

ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो फुटबॉल स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम केला, पण त्यापूर्वी त्याच्या एका कृतीचा फटका स्पर्धेचे अधिकृत पुरस्कर्ते असलेल्या कोका कोलास बसला. त्याने पत्रकार परिषदेच्यावेळी कोका-कोलाच्या दोन बाटल्या बाजूला करीत आपण पाणीच पिणार, असे सांगितल्यामुळे कोका-कोलाचे शेअर घसरले.

लिस्बन - ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो फुटबॉल स्पर्धेतील सर्वाधिक गोलचा विक्रम केला, पण त्यापूर्वी त्याच्या एका कृतीचा फटका स्पर्धेचे अधिकृत पुरस्कर्ते असलेल्या कोका कोलास बसला. त्याने पत्रकार परिषदेच्यावेळी कोका-कोलाच्या दोन बाटल्या बाजूला करीत आपण पाणीच पिणार, असे सांगितल्यामुळे कोका-कोलाचे शेअर घसरले. त्यांना एकूण ४ अब्ज डॉलरचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. 

तंदुरुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या रोनाल्डोने युरो स्पर्धेतील हंगेरीविरुद्धच्या लढतीपूर्वी पत्रकार परिषदेत कोका-कोला बाजूला केले. एवढेच नव्हे तर पाण्याची बाटली उंचावून अॅक्वा म्हणत कोका-कोलाऐवजी पाण्यास पसंती असल्याचे दाखवले. रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका-कोलाचे मार्केट मूल्य ४ अब्ज डॉलरने कमी झाल्याचे दी गार्डीयनने म्हटले आहे. कोका-कोलाचा शेअर ५६.१० डॉलरवरून ५५.२२ डॉलरपर्यंत खाली गेला. त्यांचे मार्केट मूल्य २४२ अब्ज डॉलरवरून २३८ अब्ज डॉलरपर्यंत खाली गेले. रोनाल्डोची समाजमाध्यमांवरील ताकद लक्षात घेतल्यास कोका-कोलास अजून फटका बसू शकेल. त्याचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स ३० कोटींच्या आसपास आहेत. कोका-कोलाने हा वाद न वाढवण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येकास आपल्याला आवडते तसेच गरजेनुसार पाहिजे ते पेय पिण्याचा पूर्ण हक्क आहे, असे सांगितले. 

रोनाल्डोचे युरो स्पर्धेत १०६ विक्रमी गोल

  • रोनाल्डोचे पूर्वार्धात ४२ गोल, तर उत्तरार्धात ६४
  • सर्वाधिक १९ गोल ७६-८५ मिनीट या कालावधीत
  • ८६ ते सामना संपेपर्यंत १४ गोल तसेच ५६ ते ६५ मिनिटे आणि २१ ते ३० मिनिटे या कालावधीतही हीच कामगिरी
  • रोनाल्डोचे डाव्या पायाने २४ गोल, उजव्या पायाने ५७ तर हेडरचे २५
  • मैदानी गोल ८४, फ्री किकवर १० तर पेनल्टीवर १२
  • अंदोरा, हंगेरी, लक्झेम्बर्गविरुद्ध सर्वाधिक प्रत्येकी ६ गोल, तर आर्मेनियाविरुद्ध ५
  • मॉतिन्हो, क्वारेस्मा यांच्या पासवर प्रत्येकी ८ गोल, तर बर्नार्डो सिल्वा याची ६ गोलसाठी मदत

​ ​

संबंधित बातम्या