रोनाल्डो, मेस्सीला मागे टाकत लेवान्डोव्हस्कीने मारली बाजी   

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 18 December 2020

रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने बायर्न म्यूनिचकडून खेळताना यंदाच्या मोसमात सर्वाधिक 55 गोल केले आहेत.

पोलंडचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलर हा पुरस्कार जिंकला आहे. व यात त्याने फुटबॉल जगतातील दोन सुपरस्टार्स यांना मागे टाकत हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने बायर्न म्यूनिचकडून खेळताना यंदाच्या मोसमात सर्वाधिक 55 गोल केले आहेत. आणि तसेच त्याच्या या कामगिरीने त्याने संघाला अनेक आंतरराष्ट्रीय आणि घरगुती ट्रॉफी जिंकून दिली. 

इंग्लिश प्रीमिअर लीग : लिसेस्टर सिटीवर मात करत एव्हर्टन पाचव्या स्थानावर   

सर्वोत्कृष्ट फुटबॉलर पुरस्काराच्या अंतिम यादीत रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीसह युव्हेंट्स संघाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बार्सिलोना संघाचा लिओनेल मेस्सी यांचा समावेश होता. मात्र यात  रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने बाजी मारत ही ट्रॉफी जिंकली. या पुरस्काराच्या वितरणासाठी फिफाने ज्यूरिचमध्ये व्हर्चुअल कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र फिफाचे अध्यक्ष जियान्नी इन्फॅंटिनो हे रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीला हा पुरस्कार देण्यासाठी वैयक्तिकरित्या म्यूनिच येथे गेले होते. 

योगाचा स्पर्धात्मक खेळात समावेश 

दरवर्षी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट फुटबॉलर पुरस्कार हा 2008 पासून ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे पटकावत होते. तर 2018 मध्ये पहिल्यांदाच या दोघांशिवाय क्रोएशियाच्या लुका मोड्रिचने हा पुरस्कार आपल्या नावावर केला होता. आणि त्यानंतर आता यावर्षी रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने बाजी मारत या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केला आहे. याशिवाय बायर्न म्यूनिचच्या फुटबॉलपटूला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.


​ ​

संबंधित बातम्या