ब्राझीलच्या कोलंबियावरील विजयास रेफरी टच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 June 2021

ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाचा २-१ असा पराभव केला, पण ब्राझीलच्या या विजयात पंचांनीही वाटा उचलला. कोलंबियाच्या चाहत्यांनी तर ब्राझील बारा खेळाडूंनी खेळत असल्याची टीका केली.

साओ पावलो - ब्राझीलने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाचा २-१ असा पराभव केला, पण ब्राझीलच्या या विजयात पंचांनीही वाटा उचलला. कोलंबियाच्या चाहत्यांनी तर ब्राझील बारा खेळाडूंनी खेळत असल्याची टीका केली.

ब्राझीलने सलग अकरावा विजय `इलेवंथ अवर''ला नोंदवला. आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहासात क्वचितच दहा मिनिटांची भरपाईची वेळ देण्यात येते. आणि ब्राझीलने हा निर्णायक गोल सामन्यातील शंभराव्या मिनिटास केला. या विजयाने आम्ही किती मानसिकदृष्ट्या किती कणखर आहोत, हेच दाखवले. आम्ही प्रतिकूल परिस्थितीत शांत राहिलो, त्यामुळे जिंकलो, असे ब्राझी कर्णधार कॅसेमिरो याने सांगितले.

ब्राझील लढत झालेल्या रिओ दे जेनेरिओ येथे गेल्या नऊ लढती जिंकताना एकच गोल स्वीकारला होता, पण त्यांना दहाव्या मिनिटास पिछाडी स्वीकारावी लागली. चिवट कोलंबिया गोलक्षेत्रात खेळ उंचावत ब्राझीलला रोखून होते. बारा मिनिटे असताना ब्राझीलने बरोबरी साधली ती नाट्यमय घडामोडीनंतर. ब्राझीलने रचलेल्या चालीच्यावेळी पास करण्यात आलेला चेंडू रेफरी नेस्तॉर पिताना यांना लागून ब्राझील खेळाडूकडे गेला. विश्वकरंडक अंतिम सामन्याचा अनुभव असलेले पिताना लढत थांबवतील, अशी अपेक्षा होती. मात्र खेळ सुरूच राहिला. 

इक्वेडोर - पेरुमध्ये बरोबरी
स्वयंगोलची साथ लाभल्यानंतरही इक्वेडोरला पेरुविरुद्ध २-२ बरोबरी स्वीकारावी लागली. या बरोबरीमुळे पेरुने गटातील दुसरा क्रमांक राखला. त्यांना कोलंबियाप्रमाणेच बाद फेरीची संधी आहे. प्रत्येक गटात पाच संघ आहेत. त्यातील चार संघ बाद फेरीत प्रवेश करतात.


​ ​

संबंधित बातम्या