पीएसजीचा स्ट्रायकर खेळाडू नेमारवर बंदीची टांगती तलवार  

टीम ई-सकाळ
Wednesday, 16 September 2020

सामन्यादरम्यान गैरवर्तन केल्यामुळे नेमारला लाल कार्ड दाखविण्यात आले होते.

फ्रान्समधील फुटबॉल क्लब पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) चा स्टार स्ट्रायकर खेळाडू नेमारमुळे संघाचे व्यवस्थापक हे सध्या चिंताग्रस्त आहेत. मागील सामन्यादरम्यान गैरवर्तन केल्यामुळे नेमारला लाल कार्ड दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता नेमारवर बंदीची टांगती तलवार लटकत आहे. व्यवस्थापक थॉमस टूकेल यांना संघातील स्ट्रायकर नेमारसह तीन खेळाडूंवर संभाव्य बंदीची चिंता व्यक्त केली आहे. 

कोरोनामुळे आता बॅडमिंटन जगतातील 'ही' स्पर्धा देखील रद्द  

रविवारी 13 तारखेला लीग -1 मधील पीएसजी आणि मार्सेली यांच्यात झालेल्या सामन्यात नेमार, लेव्हिन कुर्झावा आणि लिआंड्रो परेडिस यांना रेड कार्ड दाखवून मैदानाच्या बाहेर काढण्यात आले होते. नेमारने मार्सेली संघातील खेळाडू अलवारो गोन्झालेझवर त्याच्या विरोधात वर्णद्वेषी भाष्य केल्याचा आरोप केला. त्यानंतर व्यवस्थापक टूकेल यांनी समितीच्या निर्णयाबद्दल आणि नेमारवरील संभाव्य बंदीबद्दल चिंतीत असल्याचे म्हटले आहे. शिवाय मैदानावर काहीही घडू शकते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

इटालियन टेनिस स्पर्धा: 18 वर्षीय नवोदितासमोर तीन वेळचा ग्रँडस्लॅम विजेता पराभूत

यानंतर दुसरीकडे बुन्देसलिगा क्लब बोरुसिया डॉर्टमंड 2020-21 मधील हंगामाच्या पहिल्या सामन्यात 10,000 प्रेक्षकांचे स्वागत करणार आहे. डॉर्टमंड संघाचा मोसमातील पहिला सामना मोनचेंगग्लाडबेच विरुद्ध शनिवारी १९ तारखेला होणार आहे. स्थानिक प्रशासनाने या सामन्याला स्टेडियम मधील क्षमतेच्या वीस टक्के दर्शकांना उपस्थिती लावण्यास परवानगी दिली आहे.     

 

 


​ ​

संबंधित बातम्या