युनायटेडच्या पराभवाने मँचेस्टर सिटी विजेते

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 May 2021

मँचेस्टर सिटीने चार वर्षांत तिसऱ्यांदा प्रीमियर लीग फुटबॉलचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, तसेच जेतेपदाची धूसर संधी असलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिस्टर सिटीविरुद्ध हार पत्करावी लागली आणि मँचेस्टर सिटीचे जेतेपद निश्चित झाले.

लंडन - मँचेस्टर सिटीने चार वर्षांत तिसऱ्यांदा प्रीमियर लीग फुटबॉलचे विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, तसेच जेतेपदाची धूसर संधी असलेल्या मँचेस्टर युनायटेडला लिस्टर सिटीविरुद्ध हार पत्करावी लागली आणि मँचेस्टर सिटीचे जेतेपद निश्चित झाले. 

अव्वल क्रमांकावरील मँचेस्टर सिटी आणि दुसऱ्या क्रमांकावरील युनायटेड यांच्यात आता दहा गुणांचा फरक झाला आहे आणि तीनच सामने शिल्लक आहेत. सिटीने सातव्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे, तर नऊ वर्षांत ही कामगिरी पाचव्यांदा केली आहे. हा मोसम खूपच खडतर होता, त्यामुळे या जेतेपदाचे महत्त्व वाढते. कायम सर्वोत्तम खेळासाठी प्रयत्नशील असलेल्या खेळाडूंचा मी मार्गदर्शक आहे, याचा मला अभिमान आहे, असे मँचेस्टर सिटीचे मार्गदर्शक पेप गॉर्डिआला यांनी सांगितले. गॉर्डिआला २०१६ मध्ये सिटीचे मार्गदर्शक झाले. तेव्हापासून त्यांनी इंग्लंडमधील आठ स्पर्धा जिंकल्या आहेत. 

लक्षवेधक
- मँचेस्टर सिटीने सातव्यांदा प्रीमियर लीगचे विजेते. सर्वाधिक विजेतेपदे जिंकण्याच्या स्पर्धेत आता संयुक्त पाचवे
- मँचेस्टर युनायटेड सर्वाधिक २० वेळा विजेते, त्यापाठोपाठ लिव्हरपूल (१९), आर्सेनल (१३), एव्हर्टन (९) आणि मँचेस्टर सिटी तसेच अॅस्टॉन व्हिला (प्रत्येकी ७)
- प्रीमियर लीग विजेतेपदाचा निर्णय सर्वाधिक सहाव्यांदा ओल्ड ट्रॅफर्ड येथे, 
- यापैकी तीनदा येथील लढतीत न खेळणारा संघ
- सिटीचे दोन आठवड्यातील दुसरे विजेतेपद.

बार्सिलोनाच्या आशा दुरावल्या
माद्रिद - लिओनेल मेस्सीने चमकदार गोल केला, पण बार्सिलोनास लेवांतेविरुद्ध ३-३ बरोबरी स्वीकारावी लागली, त्यामुळे बार्सिलोनाच्या ला लिगा अर्थात स्पॅनिश लीग विजेतेपद जिंकण्याच्या आशा दुरावल्या आहेत. यामुळे आता आघाडीवरील अॅटलेटिको माद्रिद बार्सिलोनास पाच गुणांनी मागे टाकू शकेल, तर रेयाल दोन गुणांनी.


​ ​

संबंधित बातम्या