ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला दशकातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Monday, 28 December 2020

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला दुबई ग्लोब सॉकर पुरस्कारामध्ये दशकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला दुबई ग्लोब सॉकर पुरस्कारामध्ये दशकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. रोनाल्डोने आपला नेहमीच प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. या पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर रोनाल्डोने सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर आनंद व्यक्त करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय रोनाल्डोने 2020 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळवलेल्या रॉबर्ट लेव्हांडोव्हस्कीचे देखील अभिनंदन केले आहे.    

इंग्लिश प्रीमिअर लीग: शेफील्ड युनायटेडवर विजय मिळवत एव्हर्टन थेट दुसऱ्या स्थानी

ख्रिस्तियानो रोनाल्डो व्यतिरिक्त, पेप गार्डिओला यांना दशकाचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणूनही निवडण्यात आले. तर यंदाच्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार रॉबर्ट लेव्हांडोव्हस्कीला देण्यात आला. आणि यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार हेन्स फ्लिक यांनी आपल्या नावावर केला आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोनॅको येथे यावर्षीचा गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कारावर बाजी मारली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागील आणि यंदाच्या हंगामात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यात देखील ख्रिस्तियानो रोनाल्डोने प्रतिस्पर्धी खेळाडू लिओनेल मेस्सीला मागे टाकले. लिओनेल मेस्सीला गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार अजूनपर्यंत मिळालेला नाही. गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार हा ज्याचे वय कमीत कमी 28 वर्षे आहे व तो सध्या मैदानावर खेळत आहे अशाच खेळाडूंना देण्यात येतो. त्याशिवाय हा पुरस्कार एखाद्या खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत एकदाच दिला जातो.  


​ ​

संबंधित बातम्या