कोपा अमेरिका स्पर्धेचे ब्राझीलमध्ये आयोजन करण्यास विरोध; मात्र यजमानांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

कोपा अमेरिका स्पर्धेचे ब्राझीलमध्ये आयोजन करण्यास अजूनही आमचा विरोध आहे, पण या स्पर्धेवर आम्ही बहिष्कार घालणार नाही, असे ब्राझील फुटबॉल संघाने स्पष्ट केले.

रिओ दे जेनेरिओ - कोपा अमेरिका स्पर्धेचे ब्राझीलमध्ये आयोजन करण्यास अजूनही आमचा विरोध आहे, पण या स्पर्धेवर आम्ही बहिष्कार घालणार नाही, असे ब्राझील फुटबॉल संघाने स्पष्ट केले.

दक्षिण अमेरिकेच्या संघातील कोपा अमेरिका स्पर्धा मूळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा अर्जेंटिना आणि कोलंबियात होणार होती, पण तेथील प्रश्नामुळे ही स्पर्धा ऐनवेळी ब्राझीलला घेण्याचा निर्णय झाला, पण ब्राझीलमधील वाढत्या कोरोना रुग्णामुळे स्पर्धा घेण्यास ब्राझील संघाचा विरोध होता.

सध्याच्या परिस्थितीत ब्राझीलमध्ये स्पर्धा संयोजन चुकीचेच आहे, पण ब्राझीलच्या पारंपरिक हिरव्या, पिवळ्या पोशाखात खेळणे ही आमच्यासाठी कायम अभिमानास्पद बाब आहे. पाचवेळच्या जगज्जेत्या संघाचे मिशन पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडण्यास तयार आहोत, असे ब्राझील संघाने सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या