VIDEO : नेमारची सामन्यानंतर प्रतिस्पर्ध्यास धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 April 2021

सामना संपल्यानतर लॉकर रूममध्ये परतताना दिआलो आणि नेमार यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी नेमारने दिआलोच्या खांद्याला जोरदार धक्का दिला. नेमारने त्याला रोखण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकास धक्का दिला.

पॅरीस : पेनल्टी किक मिळवण्यासाठी दुखापत झाल्याचे नाटक करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेमारने सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूस धक्काबुक्की केली, तसेच त्याने सुरक्षा रक्षकासही ढकलून दिले. नेमारला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूस किक मारल्याबद्दल रेड कार्ड दाखवण्यात आले होते. सामना सपल्यानंतर नेमारने त्याच खेळाडूस लक्ष्य केले. 

नेमार खेळत असलेला पीएसजी संघ लीलीविरुद्ध ०-१ असा पराजित झाला. सामन्यातील ९० व्या मिनिटास प्रतिस्पर्धी संघाचा राईट बॅक तिआगो दिआलो याला किक मारल्याबद्दल नेमारला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्या वेळी नेमारने दिआलोच्या ताब्यातील चेंडूवर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दाखवले होते. दिआलो यास पूर्वार्धात नेमारच्या सहकाऱ्यास तोडावर हात मारल्याबद्दल ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे दिआलो यासही मैदाबाहेर काढण्यात आले.

सामना संपल्यानतर लॉकर रूममध्ये परतताना दिआलो आणि नेमार यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी नेमारने दिआलोच्या खांद्याला जोरदार धक्का दिला. नेमारने त्याला रोखण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकास धक्का दिला. त्यामुळे तो सुरक्षा रक्षक खाली पडला. अन्य सुरक्षा रक्षकांसह नेमारची बाचाबाची झाली.
दोन महिन्यांनंतर सामना खेळत असलेल्या नेमारवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सामन्यात पेनल्टी मिळवण्यासाठी त्याने दुखापतीचे नाटकही केले होते. त्याने या सामन्यात दोन फ्री किकवर गोलची संधीही दवडली. दरम्यान, घरच्या मैदावरील पाचव्या पराभवामुळे पीएसजी आठव्या क्रमांकावर गेले आहेत. अव्वल चार संघाविरुद्धच्या खराब कामगिरीचा पीएसजीला फटका बसत आहे.  
 


​ ​

संबंधित बातम्या