युक्रेनने खडतर आव्हान देण्यापूर्वी डचांची एकतर्फी हुकूमत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 June 2021

दोन गोलांच्या पीछाडीनंतर युक्रेनने चार मिनिटात दोन गोल करीत नेदरलँडला हादरवले, पण अखेर पाच मिनिटे असताना निर्णायक गोल केलेल्या डचांनी युरो फुटबॉल स्पर्धेत ३-२ अशी विजयी सलामी दिली.

क्रिकेट ॲमस्टरडॅम - दोन गोलांच्या पीछाडीनंतर युक्रेनने चार मिनिटात दोन गोल करीत नेदरलँडला हादरवले, पण अखेर पाच मिनिटे असताना निर्णायक गोल केलेल्या डचांनी युरो फुटबॉल स्पर्धेत ३-२ अशी विजयी सलामी दिली.

गेल्या काही वर्षात डचांची कामगिरी खालावली आहे. हे चित्र आपणच बदलू शकतो हे फ्रँक डे बोएर काही महिन्यांपासून सांगत आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यातील यश पुरेसे ठरणार नाही, याची बोएर यांना जाणीव आहे. त्यांची व्यूहरचना कमालीची प्रभाव ठरणार असल्याचे चित्र एका तासापर्यंत होते, पण युक्रेनने अखेरच्या मिनिटात रंगत निर्माण केली. 

बोएर यांनी मार्गदर्शकपदाच्या ११ सामन्यांच्या कालावधीत फारसे यश लाभलेले नाही. मेक्सिको, तुर्कीविरुद्धचे पराभव चाहत्यांना सलणारे होते. मात्र महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपण तयार असल्याचे संकेत नक्कीच या सामन्यातून दिसले. त्यांनी युवा आणि अनुभवाची चांगली मोट बांधल्याचे जाणवत होते. 

तपशील    नेदरलँड   युक्रेन
चेंडूवर वर्चस्व     ६१%     ३९%
शॉटस्     १९     ७
ऑन टार्गेट     ७     ५
कॉर्नर्स     ५     १
फाऊल्स     ८     ८
पासेस    ६८८     ४२४


​ ​

संबंधित बातम्या