देशातील एक हजार  फुटबॉल  प्रशिक्षकांना मदत;  आदित्य ठाकरेंचे सहकार्य

दीपक कुपन्नावर
Saturday, 26 September 2020

देशातील एक हजार  फुटबॉल  प्रशिक्षकांना मदत एआयफसीचा पुढाकार: आदित्य ठाकरेंचे सहकार्य, तीन महिन्यांचे धान्यासह अत्यावश्यक वस्तु घरपोच 

मुंबई : कोरोनामुळे संपुर्ण क्रिडाविश्वच ठप्प झाले आहे. त्याचा फटका क्रिडाक्षेत्रातील सर्वच घटकांना बसला आहे. याची जाणीव ठेवुन भारतीय फुटबॉल  प्रशिक्षक असोसिएशनने ( एआयफसी ) देशातील तब्बल 1 हजार प्रशिक्षकांना मदतीचा हात दिला आहे. तीन महिने पुरेल इतके धान्य आणि अत्यावश्यक वस्तु प्रशिक्षकांना घरपोच देण्यात आल्या. यासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ( विफा ) उपाध्यक्ष आदित्य ठाकरेंनी सहकार्य़ केले आहे.

मार्च मध्यापासून कोरोनाचा संर्सग वाढू नये यासाठी लॉकडाऊन  सुरु झाले. मुळातच देशातील 95 टक्यांपेक्षा अधिक फुटबॅल प्रशिक्षक विविध शाळा, महाविद्यालये, अकादमी, संघ याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात नोकरी करतात. व्यावसायिक संघ वगळता इतर ठिकाणी तुटपुंज्या मानधनवराच या प्रशिक्षकांना गुजराण करावी लागते. त्यातच सराव बंद झाल्याने त्यांचे तोकडे मानधनही थांबले. तसेच दरवर्षी उन्हाळी सुट्टीत शिबिरे घेऊन हे प्रशिक्षक पावसाळ्याची बेगमी करतात. पंरतूं यंदा सुट्टी सुरु होण्याअगोदरच कोरोनाने जणु त्यांचे उत्पन्नाचे साधनच  लॉकडाऊन केले.

लॉकडाउनची आप्तकालीन परिस्थिती लक्षात घेऊन गरजु प्रशिक्षकांना मदतीसाठी एआयफसीने निर्णय घेतला. मात्र, देशातील अशा प्रशिक्षकांची मोठ्या संख्येमुळे आर्थिक बाजु कशी उभारायची हा प्रश्न होता. प्रशिक्षंकाची नाजुक स्थिती नजरेसमोर ठेवुन विफाचे उपाध्यक्ष श्री. ठाकरे यांनी जीवनाश्यक वस्तु देण्याची जवाबदारी उचलली. बिकट स्थितीमुळे किमान एका कुटुंबाला तीन महिने पुरेल इतके धान्याचा किटमध्ये समावेश केला. एआयफसीने आपल्या संचालक मंडळाच्या माध्यमातुन सर्व राज्यातील गरजु प्रशिक्षकांचा आढावा घेतला.

मदतीच्या किट वितरणासाठी पुर्व, पश्चिम, दशिण, उत्तर आणि मध्य अशा पाच केंद्रात राज्यांची विभागणी करण्यात आली. जेष्ठ प्रशिक्षकांवर या वितरणाची जवाबदारी देण्यात आली. खासकरुन अनेक ठिकाणी लॉकडाउन अवस्थेमुळे मदतीचे किट प्रशिक्षकांच्या थेट घरपोच देण्यात आले. गरजु प्रशिक्षकांची संख्या अधिक असल्याने दुसया ठप्यातही काहींना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी अनेक प्रशिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.       

‘’देशातील फुटबॅल प्रशिक्षकासाठी लॉकडाऊन मध्ये एआयफसीमार्फत वेबिनार घेतले. त्यावेळी  हंगामी तत्वावर नोकरी  करणाया प्रशिक्षकांचा  उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे जाणवले. त्यासाठीच केवळ बौध्दीक नव्हे तर पोटाची भुक भागावी यासाठी जीवनाश्यक वस्तूचें पहिल्या ठप्यात एक हजार किटची प्रशिक्षकांना मदत पोहचवली आहे.’’
-    दिनेश नायर,
संचालक, एआयफसी, मुंबई
 


​ ​

संबंधित बातम्या