मेक्सिको - अमेरिकेच्या फुटबॉलपटूत संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 June 2021

अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील कॉनकॅफ नेशन्स लीग फुटबॉल अंतिम सामन्याच्या वेळी खेळाडूत चकमकी झडल्या. एवढेच नव्हे, तर आपला संघ पराजित होत आहे हे पाहून संतापलेल्या मेक्सिकोच्या चाहत्यांनी मैदानात दगडफेक केली, त्यात मेक्सिकोचे खेळाडूही जखमी झाले.

मेक्सिको सिटी - अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील कॉनकॅफ नेशन्स लीग फुटबॉल अंतिम सामन्याच्या वेळी खेळाडूत चकमकी झडल्या. एवढेच नव्हे, तर आपला संघ पराजित होत आहे हे पाहून संतापलेल्या मेक्सिकोच्या चाहत्यांनी मैदानात दगडफेक केली, त्यात मेक्सिकोचे खेळाडूही जखमी झाले.

उत्तरार्धात चाहते जास्त आक्रमक झाले आणि त्यांनी मैदानात वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यातील एक अमेरिकेचा गिओ रेयाना याच्या तोंडावर लागली. चाहत्यांना प्रतिस्पर्धी संघांबद्दल कोणताही आदर नव्हता, खेळाडूंच्या प्रयत्नांचे कौतुक नव्हते. गिओ ठीक असेल अशी अपेक्षा आहे, पण त्याच्या मनावर तीव्र जखमा झाल्या असतील, असे अमेरिकेचे मार्गदर्शक ग्रेग बॅहार्लतर यांनी सांगितले. 

अमेरिका आणि मेक्सिको हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यातील लढतीच्या वेळी मैदानावर कायम तणाव असतो हेच या वेळीही दिसले. माफक फाऊलवरूनही दोन संघांत वादावादी सुरू होती.


​ ​

संबंधित बातम्या