फिफाच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या शर्यतीत मेस्सी, रोनाल्डो, सालाह आणि लेवान्डोस्की

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी,  इजिप्तचा महंमद सालाह आणि पोलंडचा रॉबर्ट लेव्हान्डोस्की यांना यावर्षीच्या फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कारासाठी (सर्वोत्कृष्ट फिफा पुरूष खेळाडू पुरस्कार) निवडण्यात आले आहे.

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी,  इजिप्तचा महंमद सालाह आणि पोलंडचा रॉबर्ट लेव्हान्डोस्की यांना यावर्षीच्या फिफाच्या सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कारासाठी (सर्वोत्कृष्ट फिफा पुरूष खेळाडू पुरस्कार) निवडण्यात आले आहे. मागील वर्षी लियोनेल मेस्सीने हा पुरस्कार जिंकला होता. या चौघांव्यतिरिक्त थिएगो अलसॅट्रा, केव्हिन डी ब्रुएन, सॅडिओ माने, कॅलियन एमबापे, नेमार, सर्जिओ रामोस आणि व्हर्जिन व्हॉन डिक यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

यावर्षी यूएफा लीग स्पर्धेत प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकणारा पोलंडचा रॉबर्ट लेव्हान्डोस्की सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या श्रेणीतील फिफा पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रॉबर्ट लेव्हान्डोस्कीने 2019-20 च्या चॅम्पियन्स लीग सत्रात आपल्या दमदार खेळीच्या जोरावर विजेतेपद मिळवून दिले होते. यानंतर महिलांच्या फुटबॉल गटातील ल्युसी ब्रॉन्ज, डेल्फीन कॅस्करिनो, कॅरोलिन ग्रॅहम हॅन्सेन यांच्यासह 11 खेळाडूंची सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.        

क्रिकेटमधील दादा म्हणाला, मी तुझ्यासाठी फुटबॉल पाहायचो

याशिवाय, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कारासाठी लुईस कोर्टेस आणि रीटा ग्वारिनो यांना महिला गटात नामांकन देण्यात आले आहे. तर पुरुष गटात जर्गन क्लोप, मासेर्लो बिअल्सा आणि झिनेडिन झिडन यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा सप्टेंबर मध्ये आयोजित करण्यात येणार होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता 17 डिसेंबरला हा सोहळा आभासी पद्धतीने आयोजित केला जाईल.

तसेच, यंदाची फिफा बेस्ट फुटबॉलर पुरुष पुरस्काराची स्पर्धा मेस्सी, रोनाल्डो आणि सालाह यांच्यात पाहायला मिळणार आहे. मेस्सीने गेल्या वर्षी हा पुरस्कार जिंकला होता. आणि तो यावेळी एक प्रबळ दावेदारही आहे. मात्र रोनाल्डो आणि सालाहने त्याला टक्कर देण्याची अपेक्षा आहे.
  

 


​ ​

संबंधित बातम्या