प्रतिस्पर्धाला नडणाऱ्या मेस्सीवर रेड कार्डनंतर ओढावली बंदीची कारवाई

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 20 January 2021

मागील 17 वर्षांपासून मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळतोय. 2004 पासून या क्लबकडून खेळताना त्याला कधीही रेड कार्डमुळे बाहेर जाण्याची वेळ आली नव्हती. त्याने बार्सिलोनाकडून 753 सामन्यांचे प्रतिनिधीत्व केले आहे.  

स्पॅनिश सुपर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला नडल्याचे पाहायला मिळाले होते. सामना अखेरच्या टप्प्यात असताना त्याने अशोभनिय कृत्य केले. यावेळी त्याला मॅच रेफ्रींनी रेड कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला. 17 वर्षांनंतर मेस्सीवर रेड कार्डमुळे बाहेर जाण्याची वेळ आली. हे प्रकरण एवढ्यावर थांबलेल नाही. तर त्याला आता दोन सामन्याला मुकावेही लागणार आहे. 

स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम फेरीत शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना त्याने केलेल्या प्रकारानंतर त्याच्यावर 4-12 सामन्यांची बंदी घालण्यात येऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. मात्र एवढ्या मोठ्या कारवाईतून त्याला थोडाफार दिलासा मिळालाय.

मागील 17 वर्षांपासून मेस्सी बार्सिलोना क्लबकडून खेळतोय. 2004 पासून या क्लबकडून खेळताना त्याला कधीही रेड कार्डमुळे बाहेर जाण्याची वेळ आली नव्हती. त्याने बार्सिलोनाकडून 753 सामन्यांचे प्रतिनिधीत्व केले आहे.  

ब्रिस्बेन टू संगमनेर विजयाचा गोडवा; अजिंक्यच्या आजीसोबत गावकऱ्यांचा आनंदोत्सव

स्पॅनिश सुपर कपच्या अंतिम सामन्या रविवारी एथलेटिक बिल्बाओकडून बार्सिलोनाला 3-2 असा पराभवाचा सामना करावा लागला.  निर्धारित वेळेतील बरोबरीमुळे या सामन्याचा निकाल  अतिरिक्त वेळेत गेला. मेस्सीने या सामन्यात एथलेटिक बिल्बाओच्या फॉरवर्डला खेळणाऱ्या एशियर व्हिलालिब्रेला मेस्सीने हात उगारला होता. त्याला धक्का दिल्याने मॅच रेफ्रींनी मेस्सीला रेड कार्ड दाखवलं. रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने त्याच्यावर कारवाई केली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या