मेस्सीने साकारला अर्जेंटिनाचा विजय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

कोरोनाच्या निर्बंधामुळे बॉम्बोनेरा स्टेडियम अर्जेंटिनाची लढत सुरू असतानाही शांत होते. गतवर्षी आंतरराष्ट्रीय लढतीत अर्जेंटिनाने इक्वेडोरचा ६-१ धुव्वा उडवला होता.

ब्यूनोस आर्यस : बार्सिलोना क्‍लबमधील संघर्ष पूर्णपणे बाजूला ठेवत लिओने मेस्सीने अर्जेंटिनास विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत इक्वेडोरविरुद्ध 1-0 विजय मिळवून दिला. त्याने तेराव्या मिनिटास पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरला.

मेस्सी आणि बार्सिलोना क्‍लबमधील संघर्षाची चर्चा जास्त होती. त्याचा परिणाम त्याने बार्सिलोनाकडून खेळताना होऊ दिला नव्हता. राष्ट्रीय संघातून खेळताना तो जास्त मुक्तपणे तसेच दडपणाविना खेळत असल्याचे जाणवले. चार वर्षांपूर्वी अर्जेंटिनास विश्वकरंडकाच्या पात्रता स्पर्धेत सलामीला इक्वेडोरविरुद्ध ०-२ हार पत्करावी लागली होती, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, हीच अर्जेंटिना चाहत्यांची अपेक्षा होती आणि मेस्सीच्या प्रभावी कामगिरीमुळे हेच घडले. 

CSKvsKKR : फाफ-जड्डूमध्ये कमालीचा ताळमेळ, फलंदाजाला धाडले तंबूत (VIDEO)

कोरोनाच्या निर्बंधामुळे बॉम्बोनेरा स्टेडियम अर्जेंटिनाची लढत सुरू असतानाही शांत होते. गतवर्षी आंतरराष्ट्रीय लढतीत अर्जेंटिनाने इक्वेडोरचा ६-१ धुव्वा उडवला होता.
 


​ ​

संबंधित बातम्या