अपयशाचे शल्य आयुष्यभर; हॅरी केन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 July 2021

युरो करंडक जिंकण्यासाठी आम्ही योग्य मार्गावर होतो, परंतु अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर झालेला पराभव आयुष्यभर वेदना देत राहील, अशी खंत इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने व्यक्त केली. पुढच्या वेळी नक्कीच एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असा आशावादही त्याने व्यक्त केला.

लंडन - युरो करंडक जिंकण्यासाठी आम्ही योग्य मार्गावर होतो, परंतु अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर झालेला पराभव आयुष्यभर वेदना देत राहील, अशी खंत इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने व्यक्त केली. पुढच्या वेळी नक्कीच एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करू, असा आशावादही त्याने व्यक्त केला.

इटलीविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडने गोल करून आघाडी घेतली होती, त्यामुळे विजेतेपदाची सर्वाधिक संधी त्यांच्यासमोर होती, पण इटलीने झुंझार खेळ करत केलेली बरोबरी जादा डावातही कायम राहिली; मात्र पेनल्टी शूटआऊटवर इंग्लंडकडून तीन पेनल्टी वाया दडवण्यात आल्या, त्यातच त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला.

विजेतेपद हातून निसटले असले, तरी संपूर्ण सामन्यात आम्ही सर्वस्व दिले होते. त्यामुळे पराभवानंतरही आमची मान ताठ असेल असे केन म्हणाला. यापेक्षा आम्ही अधिक देऊ शकत नव्हतो, सर्व खेळाडूंनीही अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केले, पण पेनल्टीमध्ये पराभूत होतो तेव्हा तो पराभव अधिक वेदनादायी असतो, अशी भावना केनने व्यक्त केली.

रविवारची रात्र आमची नव्हती हे खरे असले तरी संपूर्ण स्पर्धा आमच्यासाठी अविस्मरणीय होती. पराभवाचे शल्य निश्चितच असणार आहे, परंतु संपूर्ण स्पर्धेत केलेला खेळ पाहता आम्ही निराशेने मान खाली खालणार नाही. पुन्हा योग्य मार्गावर येऊ, असा विश्वास व्यक्त केला.

एकत्र जिंकलो, एकत्र हरलो...
हॅरी केनने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर गोल करून इंग्लंडसाठी अचुक सुरुवात करून दिली  होती, परंतु बदली खेळाडू मार्कस रॅशफोर्ड, जाडोन सँचो आणि बुकायो साका या तीन नवोदितांना गोल करता आले नाहीत. या तिघांनीही स्पर्धेत चमकदार खेळ केला होता. पेनल्टी शूटआऊटवर कोणाचीही पेनल्टी चुकू शकते, आम्ही एकत्र जिंकलो आणि एकत्रच पराभूत झालो, अशा शब्दांत केनने आपल्या नवोदित खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी अधिक मोठ्या ध्येयाने ते झपाटून जातील, असे केन म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या