युरोपीय फुटबॉलमध्ये लेवांडोवस्की सर्वोत्तम 

संजय घारपुरे
Friday, 2 October 2020

युरोपातील फुटबॉल स्पर्धांत हुकूमत राखलेल्या बायर्न म्युनिचचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की याची युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.

पॅरिस : युरोपातील फुटबॉल स्पर्धांत हुकूमत राखलेल्या बायर्न म्युनिचचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की याची युरोपातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड झाली. महिलांमध्ये हा मान चेल्सीने नुकतीच खरेदी केलेल्या पर्निली हार्डरला मिळाला. 

विलगीकरण नियमामुळे टेबल टेनिस खेळाडू शिबिरापासून दूर 

लेवांडोवस्की सर्वोत्तम ठरणार हा जवळपास सर्वांचाच कयास होता. त्याने बायर्नला सहाव्यांदा चॅम्पियन्स लीग जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बाजवली. त्याने या लांबलेल्या मोसमात 47 लढतींत 55 गोल करण्याचा पराक्रम केला. त्याने सर्वोत्तम खेळाडूंच्या स्पर्धेत मॅंचेस्टर सिटीचा केविन डे ब्रूएन आणि बायर्नचा गोलरक्षक मॅन्यूएल नेऊर यांना हरवले. लेवांडोवस्की याचीच सर्वोत्तम आक्रमक म्हणून निवड झाली. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये एकंदर 15 गोल केले. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या प्रत्येक लढतीत गोल केला. त्याने रेड स्टार बेलग्रेडविरुद्ध चौदा मिनिटांतच चार गोल केले होते. त्याने जर्मनी लीगमध्ये सर्वाधिक 38 गोल करीत सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मिळवले. 

24 किकच्या शूटआऊटमध्ये मिलानची सरशी 

जर्मनीतील वोल्फस्‌बर्ग संघाकडून खेळलेल्या आणि आता चेल्सीबरोबर करारबद्ध झालेल्या हार्डरने सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला. तिचा संघ चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पराजित झाला होता, पण तिने प्रभावी कामगिरी केली होती. तिने जर्मनीतील लीगमध्ये 22 सामन्यांत 27 गोल करीत वोल्फस्‌बर्ग संघास विजयी केले होते. आता हार्डरच्या आगमनामुळे चेल्सीची ताकद वाढली आहे.

 

 


​ ​

संबंधित बातम्या