ला लिगा : वियारियालवर विजय मिळवत सेविलाचा संघ चौथ्या स्थानावर 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत सेविला आणि वियारियाल यांच्यात झालेल्या सामन्यात सेविलाच्या संघाने दमदार विजय मिळवला आहे.

ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत सेविला आणि वियारियाल यांच्यात झालेल्या सामन्यात सेविलाच्या संघाने दमदार विजय मिळवला आहे. यासोबतच सेविलाच्या संघाने क्रमवारीत चौथे स्थान काबीज केले आहे. आज झालेल्या या सामन्यात सेविलाने वियारियालचा 2 - 0 ने पराभव केला. वियारियालला हरवून सेविलाच्या संघाने यंदाच्या हंगामातील आठवा विजय मिळवला आहे.    

ऑलिम्पिक मध्ये प्रतिनिधित्व केलेल्या दिग्गज फुटबॉलपटूचे निधन   

सेविला आणि वियारियाल यांच्यात झालेल्या सामन्यात झालेल्या सामन्यात, सेविला संघातील लुकासने 8 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्याच्या दुसऱ्या सत्रात योसेफने 53 व्या मिनिटाला गोल करून सेविला संघाला बढत मिळवून दिली. तर वियारियालला सामन्यात एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

दरम्यान, ला लिगाच्या क्रमवारीत अ‍ॅटलीटिको माद्रिदचा संघ पहिल्या स्थानावर आहे. अ‍ॅटलीटिको माद्रिद संघाने 13 सामन्यांपैकी 10 सामन्यात विजय मिळवत 32 गुण जमवले आहेत. त्यानंतर रियल माद्रिद संघाने 15 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवत 32 अंकांसह दुसरे स्थान राखले आहे. अ‍ॅटलीटिको माद्रिद आणि रियल माद्रिद संघांचे अंक समान असले तरी, अ‍ॅटलीटिको माद्रिद संघाचे गोल अधिक असल्याने अ‍ॅटलीटिको माद्रिदचा संघ पहिल्या स्थानावर आहे.           india 


​ ​

संबंधित बातम्या