La Liga : मेस्सीने मोडला पेलेंचा विक्रम 

संजय घारपुरे
Wednesday, 23 December 2020

20 पास करून मिळालेल्या चेंडूवर मेस्सीचा गोल 

माद्रिद : लिओनेल मेस्सीने पेले यांच्या एकाच क्‍लबकडून सर्वाधिक 643 गोल करण्याचा विक्रम मोडीत काढला, पण मेस्सीचा हा गोल 20 वेळा चेंडू पास होऊन झाल्यामुळे जास्तच संस्मरणीय झाला. ला लीगा मोसमातील हा सर्वाधिक पासचा गोल आहे. 

ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला 'गोल्डन फूट ऑफ द इयर'चा मानकरी 

बार्सिलोनाने ला लिगा अर्थात स्पॅनिश साखळीत व्हॅलादॉलिद संघाला 3-0 असे हरवले. या सामन्यातील बार्सिलोनाचा तिसरा गोल मेस्सीने केला. मेस्सीने बार्सिलोनाकडून खेळताना आता 644 गोल केले आहेत. पेले यांनी सॅंतोस संघाकडून खेळताना 643 गोल करण्याचा पराक्रम केला होता. बार्सिलोनाच्या या सामन्यातील पहिल्या दोन गोलातही मेस्सीचा मोलाचा वाटा होता. पहिल्या गोलच्या वेळी त्याचा अचूक क्रॉस मोलाचा ठरला होता. तर दुसऱ्या गोलच्या वेळी त्याने प्रभावी चाल रचली होती. या कामगिरीमुळे मोसमात बार्सिलोनाने पाच अवे लढतीत प्रथमच विजय मिळवला. 

माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांना फिफाचा दणका 

फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली त्या वेळी विक्रम मोडण्याचा विचारही मनात नव्हता. पेले यांच्या विक्रमापर्यंत वाटचाल करता येईल असे कधीही वाटले नव्हते. या सर्व गोलांसाठी साथ देणाऱ्या प्रत्येकाचा मी आभारी आहे, असे मेस्सीने सांगितले. मेस्सीने बार्सिलोनाकडून 749 वी लढत खेळत असताना विक्रमी गोलांचा टप्पा गाठला. त्याने आता प्रत्येकी 1.16 सामन्यांमागे एक गोल केला आहे. मेस्सीचा विक्रमी गोल हा सलग 20 पासांची फलश्रुती होती. हे या ला लिगा मोसमातील अखंडित पास आहेत. 

No photo description available.

 


​ ​

संबंधित बातम्या