ला लिगा फ़ुटबॉल लीग : मेस्सीच्या दोन गोलमुळे बार्सिलोनाचा ऍथलेटिक क्लबवर विजय 

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 7 January 2021

स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने ऍथलेटिक क्लबचा पराभव केला आहे.

स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने ऍथलेटिक क्लबचा पराभव केला आहे. बार्सिलोना आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात आज झालेल्या सामन्यात बार्सिलोना संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने दोन गोल नोंदवले. बार्सिलोना संघाने ऍथलेटिक क्लबवर 3 - 2 ने विजय मिळवला आहे. व यासह बार्सिलोनाचा संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

सिरी ए फुटबॉल लीग : फेडरिकोच्या गोलने यूव्हेन्टसचा मिलानवर दमदार विजय 

बार्सिलोना आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात, ऍथलेटिक क्लबच्या विल्यम्सने सामन्याच्या सुरवातीलाच अवघ्या तिसऱ्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर बार्सिलोनाच्या पैड्रीने 14 व्या मिनिटाला गोल करून बार्सिलोना संघाला सामन्यात 1 - 1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर बार्सिलोना संघाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी संघासाठी धावून आल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. लिओनेल मेस्सीने 38 व्या मिनिटाला पहिला गोल करून संघाला पुन्हा बढत मिळवून दिली. तर सामन्याच्या पुढच्या सत्रात त्याने 62 व्या मिनिटाला दुसरा गोल करून, बार्सिलोना संघाला 3 - 1 ने आघाडी मेळवून दिली. लिओनेल मेस्सीच्या या गोल नंतर ऍथलेटिक क्लबच्या इकर मुनिअनने 90 व्या मिनिटाला गोल केला. मात्र त्यानंतर ऍथलेटिक क्लबला एकही गोल करता आला नाही. आणि त्यामुळे सामना बार्सिलोनाने 3 - 2 ने आपल्या खिशात घातला. 

दरम्यान, ला लिगाच्या क्रमवारीत अ‍ॅटलीटिको माद्रिदचा संघ पहिल्या स्थानावर आहे. अ‍ॅटलीटिको माद्रिद संघाने 15 सामन्यांपैकी 12 सामन्यात विजय मिळवत 38 गुण जमवले आहेत. त्यानंतर रियल माद्रिद संघाने 17 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 36 अंकांसह दुसरे स्थान राखले आहे. तर बार्सिलोनाचा संघ आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. बार्सिलोनाच्या संघाने 17 पैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. व त्यांचे आता 31 अंक झालेले आहेत. त्याच्यानंतर रियल सोशिएदाद 30 गुणांसह चौथ्या आणि व्हिललारियल 29 अंकांसह पाचव्या स्थानावर आहे.                


​ ​

संबंधित बातम्या