ला लिगा : बार्सिलोनाचा दमदार विजय; ग्रॅनडाविरुद्ध लिओनेल मेस्सीचे दोन गोल 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने दमदार कामगिरी करत ग्रॅनडा संघाचा पराभव केला आहे.

स्पॅनिश ला लिगा फ़ुटबॉल लीग स्पर्धेत बार्सिलोना संघाने दमदार कामगिरी करत ग्रॅनडा संघाचा पराभव केला आहे. बार्सिलोना आणि ग्रॅनडा यांच्यात काल झालेल्या सामन्यात बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीने दोन गोल केले. तर अँटोनी ग्रीझमनने दोन गोल नोंदवले. त्यामुळे बार्सिलोना संघाने ग्रॅनडावर 4- 0 ने विजय मिळवला आहे. 

सिरी ए फुटबॉल लीग : टोरिनोवर मात करत मिलान क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम 

बार्सिलोना आणि ग्रॅनडा यांच्यात झालेल्या सामन्यात, बार्सिलोना संघाच्या अँटोनी ग्रीझमनने 12 व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने 35 व्या मिनिटाला पहिला गोल करून बार्सिलोना संघाला बढत घेऊन दिली. यानंतर पुन्हा एकदा लिओनेल मेस्सीने 42 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. तर सामन्याच्या दुसऱ्या सत्रात 63 व्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमनने अजून एक गोल नोंदवला. त्याउलट ग्रॅनडा संघाला सामन्यात एकही गोल करता आला नाही. आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवाय ग्रॅनडाच्या संघातील जेसस वेलीजोला 78 व्या मिनिटाला रेड कार्ड मिळाल्याने त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. 

दरम्यान, ला लिगाच्या क्रमवारीत अ‍ॅटलीटिको माद्रिदचा संघ पहिल्या स्थानावर आहे. अ‍ॅटलीटिको माद्रिद संघाने 15 सामन्यांपैकी 12 सामन्यात विजय मिळवत 38 गुण जमवले आहेत. त्यानंतर रियल माद्रिद संघाने 18 पैकी 11 सामन्यांमध्ये विजय मिळवत 37 अंकांसह दुसरे स्थान राखले आहे. तर बार्सिलोनाचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. बार्सिलोनाच्या संघाने 18 पैकी 10 सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे. व त्यांचे आता 34 अंक झालेले आहेत. त्याच्यानंतर व्हिललारियलचा संघ 32 अंकांसह चौथ्या व रियल सोशिएदाद 30 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.         


​ ​

संबंधित बातम्या