तीन वर्षांत हिरोचा झीरो

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 June 2021

वयाच्या १९ व्या वर्षी किलियन एम्बापे याने फ्रान्सच्या विश्वकरंडक विजयात निर्णायक कामगिरी केली होती. रशियामधील स्पर्धेत तो सर्वोत्तम नवोदित खेळाडू ठरला होता; मात्र आता त्याने अखेरची पेनल्टी किक दवडल्याने फ्रान्सला हार पत्करावी लागली.

वयाच्या १९ व्या वर्षी किलियन एम्बापे याने फ्रान्सच्या विश्वकरंडक विजयात निर्णायक कामगिरी केली होती. रशियामधील स्पर्धेत तो सर्वोत्तम नवोदित खेळाडू ठरला होता; मात्र आता त्याने अखेरची पेनल्टी किक दवडल्याने फ्रान्सला हार पत्करावी लागली. एल इक्विपे या फ्रान्समधील वर्तमानपत्राने खूप उंचीवरून तो खाली पडला असे म्हटले आहे, पण केवळ स्वित्झर्लंडविरुद्ध दवडलेली पेनल्टी किकच नव्हे, तर एम्बापेच्या एकूणच स्टार कामगिरीबाबत या स्पर्धेत प्रश्न निर्माण झाले.

या स्पर्धेपूर्वी व्यावसायिक लढतीत ४१ गोल, पण स्पर्धेतील चार सामन्यांत एकही गोल नाही या स्पर्धेत गोलपोस्टच्या दिशेने १४ शॉट्स, पण ते सर्व विफल. या स्पर्धेत सर्वाधिक  बीबीसीकडून सामन्यासाठी ४.४४ रेटिंग, पूर्ण वेळ खेळलेल्या खेळाडूत सर्वांत कमी

एम्बापे या अपयशाने नक्कीच खूप दुःखी आहे. सर्वच खेळाडू कमालीचे निराश आहेत. एम्बापेच्या अपयशावर कोणी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. शूटआऊटवरील अखेरची पेनल्टी किक घेणे सर्वाधिक आव्हानात्मक असते. ही जबाबदारी स्वीकारण्याची त्याने तयारी दाखवली होती.
- दिदिएर देशॅम्प, फ्रान्स मार्गदर्शक


​ ​

संबंधित बातम्या