इटलीतील फुटबॉलचे हिरो पाओलो रॉस्सी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

इटलीतील फुटबॉलचे हिरो पाओलो रॉस्सी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले आहे. १९८२ मध्ये इटलीला विश्‍वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेपूर्वी काही महिने त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप ठेवून तीन वर्षे बंदी घालण्यात आली होती. रॉस्सी यांनी त्यास आव्हान दिले आणि निर्दोष असल्याचे सिद्ध केले.

रोम - इटलीतील फुटबॉलचे हिरो पाओलो रॉस्सी यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले आहे. १९८२ मध्ये इटलीला विश्‍वकरंडक जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेपूर्वी काही महिने त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप ठेवून तीन वर्षे बंदी घालण्यात आली होती. रॉस्सी यांनी त्यास आव्हान दिले आणि निर्दोष असल्याचे सिद्ध केले.

चेंडूचा अचूक अंदाज घेत पास स्वीकारण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी १९८२ च्या स्पर्धेत ब्राझीलविरुद्ध हॅट्‌ट्रीक केली. त्यांच्या दोन गोलमुळे इटलीने पोलंडला उपांत्य फेरीत २-० असे हरवले आणि त्यानंतर पश्‍चिम जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिला गोल केला होता. या स्पर्धेतील गोल्डन बूट तसेच वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता.

Edited By - Prashant Patil


​ ​

संबंधित बातम्या