ISL Season 7 मुंबई सिटी फेव्हरिट, बंगलुरुच्या कमबँकची उत्कंठा शिगेला

दीपक कुपन्नावर
Thursday, 19 November 2020

2013 मध्ये आयपीएलच्या यशाचा आदर्श घेऊन आयएसएलची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोट्यावधीं रुपयांची पारितोषिके, परदेशी नामवंत फुटबाँलपटू, आंतराष्ट्रीय दर्जाचे संयोजन, लाखों शौकीनांची उपस्थिती यामुळे ही स्पर्धा अल्पावधीत नावारुपाला आली. कोरोनामुळे यंदा होणारा सातवा मोसम विनाप्रेक्षक गोव्यात फातोर्डा (मडगाव), टिळक मैदान (वास्को) आणि जीएमसी अँथलेटिक (बांबोलीम) या तीन मैदानावर सामने होतील.

कोरोनामुळे ठप्प झालेला भारतीय क्रिडाक्षेत्रात फुटबाँलने व्दीतिय श्रेणी आय लिगव्दवारे धाडसाने हंगामाचा नारळ फोडला आहे. गोव्यात उद्यापासून (ता. 20) भारतीय फुटबाँल मधील अव्वल इंडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या

कोलकत्याच्या मोहन बागान, ईस्ट बंगालमुळे रोमाचंकता वाढणार आहे. मुंबई सिटी एफसी स्पर्धेचे फेव्हरिट मानले जात असुन यशस्वी संघ गणला जाणारा बंगलुरु, चेन्नईनच्या कामगिरीबाबत उत्सुकता आहे. विनाप्रेक्षक, तीन मैदाने, पाच बदली खेळाडू अशा वातारणात होणाया या स्पर्धेची तमाम भारतीय फुटबाँल वर्तुळात उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
 
2013 मध्ये आयपीएलच्या यशाचा आदर्श घेऊन आयएसएलची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोट्यावधीं रुपयांची पारितोषिके, परदेशी नामवंत फुटबाँलपटू, आंतराष्ट्रीय दर्जाचे संयोजन, लाखों शौकीनांची उपस्थिती यामुळे ही स्पर्धा अल्पावधीत नावारुपाला आली. कोरोनामुळे यंदा होणारा सातवा मोसम विनाप्रेक्षक गोव्यात फातोर्डा (मडगाव), टिळक मैदान (वास्को) आणि जीएमसी अँथलेटिक (बांबोलीम) या तीन मैदानावर सामने होतील. यंदा तीन ऐवजी पाच खेळाडू बदलण्याची संधी संघाना आहे. खासकरुन जागतिक फुटबाँलमध्ये लक्षवेधी असणारी कोलकत्ता डर्बीची रंगत पारंपारिक प्रतिस्पर्धी मोहन बागान आणि ईस्ट बंगालच्या सहभागाने कायम राहणार आहे.

विजेतेपदाची हँट्रीक साधणारा अँथलेटिको कोलकत्यात मोहन बागान संघ विलिन झाल्याने संघाची ताकद आणखी वाढली आहे. स्पेनचे य़शस्वी प्रशिक्षक अंतोनिया लोपेझ स्ट्रायकर राँयकृष्णा, भरवशाचा बचावपटू संदेश झिंगन यांच्या जोरावर आपल्या तिसया विजेतेपदाच्या मुकुटाला गवसणी घालण्यास सज्ज आहेत. कट्टर प्रतिस्पर्धी ईस्ट बंगाल श्री सिंमेट पुरस्कर्त्याच्या आधारे इग्लंडच्या नामवंत लिव्हरपुलचे महान खेळाडु राँबी फाँवलर यांच्या मार्गदर्शनाखाली चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. दोन वेळचा विजेता चेन्नईन एफसीची हंगेरीयन प्रशिक्षक साबा लाझ्लो यांची भिस्त ब्राझीलियन अली सबिया, राफेल क्लिव्हारो यांच्यावर आहे.

गोवा एफसीला यशाच्या शिखरावर नेणारे स्पेनचे प्रशिक्षक सर्जिआ लोबेरोनी मुंबई सिटीची धुरा स्विकारली आहे. नामंवत सिटी फुटबाँल ग्रुपने या संघाची मालकी घेत संघाची भक्कम बांधणी केली आहे. आक्रमक तत्वज्ञान प्रकाशमान करणारे लोबेरो मध्यरक्षक गतवर्षीचा प्लेअर आँफ दि इयर ह्युगो बोजुस, मंदार देसाई या पुर्वाश्रमीच्या सहकायांच्या मदतीने विजेतेपदाचा करंडक उंचावतील का याचीच मुंबईकरांना प्रतिक्षा आहे. चौदा स्थानिक खेळाडूसह गोवा एफसी नवे युवा प्रशिक्षक स्पेनचे ज्युआन फरनाडोंवर संघाची यशाची कमान आयएसएलसह एफसी चँम्पियन्स स्पर्धेत राखण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे. माजी विजेता बंगलुरु एफसीने गेल्या पाच मोसमात छाप पाडली आहे. अपवाद ठरणाया गतमोसमात उपांत्यफेरीत गारद झालेला हा संघ प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात अनुभवी स्ट्रायकर सुनिल क्षेत्री, गोलरक्षक गुरुप्रितसिंग संधूच्या मदतीने कमबँक करणार याकडेही शौकींनांचे लक्ष वेधुन आहे.  

सातवा हंगाम दृष्टीक्षेपात
-विनाप्रेक्षक पहिलीच स्पर्धा
-कोरोनासाठी बायोबबल कठोर सुरक्षितता
-पाच बदली खेळाडू
-होम अवे ऐवजी तीन मैदानावर सामने
-मोहन बागान, ईस्ट बंगालमुळे कोलकत्ता डर्बीचे कायम
- उच्चांकी सामने


​ ​

संबंधित बातम्या